नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली, हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला कोहली चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला एका गोलंदाजाची भिती वाटत होती, असे त्याने एका आपल्या एका मुलाखतीमध्येही सांगितले होते. पण आता त्याच गोलंदाजाला संघाबाहेर काढण्यात आले आहे.
एका मुलाखतीमध्ये कोहली म्हणाला होता की, " क्रिकेट विश्वात काही गोलंदाज असे आहेत की त्यांना खेळणे ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक संघामध्ये भेदक मारा करणारे गोलंदाज असतात. त्यांचा सामना करणे सोपे नसते. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीचा सामना करणे सर्वात कठिण आहे. "
आमीर हा पाकिस्तानचा सर्वात भेदक आणि अनुभवी गोलंदाज आहे. पण त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आले नव्हते. त्याबरोबर आता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 संघातही स्थान देण्यात आलेले नाही. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या संघात आमीरला स्थान देण्यात आलेले नाही.