Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

विराटने ठोकलं ७३व्या आंतरराष्ट्रीय शतक, मायदेशात सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:51 PM2023-01-10T17:51:18+5:302023-01-10T17:53:51+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli scores hundred in IND vs SL 1st ODI Ashwin predicted it before it happened tweet goes viral Rohit Sharma | Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Century Team India, IND vs SL 1st ODI: श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतर, टीम इंडियाने पहिल्या वन डे सामन्यातही चांगली सुरूवात केली. गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यातून रोहित शर्मा (Rohit Sharma) , विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पुनरागमन केले. टी२० मालिकेत  या तिघांना विश्रांती देण्यात आली होती. राहुलला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण कर्णधार रोहित शर्माने ८३ धावांची दमदार खेळी केली. त्याला शतकाने हुलकावणी दिली. पण विराट कोहलीने मात्र चाहत्यांना खुश केलं. त्याने ७३वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आधीच या शतकाची भविष्यवाणी केली होती. त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सलामीनंतर विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना विराटने सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला. शुबमन आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. २०व्या षटकात दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. त्याने रोहितसोबत १४३ धावांची भागीदारी केली. रोहितने नंतर फटकेबाजी करत ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा कुटल्या. त्याचे शतक हुकल्याने चाहते नाराज झाले. पण विराटने मात्र दमदार कामगिरी करत संघाला मोठी धावसंख्य उभारून दिली. त्याने सलग दुसरे वन डे शतक ठोकले. विराटचे शतक होण्याच्या तासभर आधीच आर अश्विनने एक ट्विट केले होते. त्यात त्याने चाहत्यांना प्रश्न विचारला होता. त्यातच त्याने विराटच्या शतकाची भविष्यवाणी केली होती.

विराटच्या ७३व्या शतकासह भारतीय संघ चारशेपार मजल मारेल का? असा सवाल त्याने ट्विटरवर विचारला होता. विराटच्या शतकाचे ट्विट खरे ठरले. पण भारताला मात्र ४०० पार मजल मारता आली नाही. ५० षटकांमध्ये भारताला ३७३ धावापर्यंतच मजल मारता आली. रोहित, शुबमन आणि विराट वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

Web Title: Virat Kohli scores hundred in IND vs SL 1st ODI Ashwin predicted it before it happened tweet goes viral Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.