Virat Kohli Half Century, IPL 2022 GT vs RCB: भारताचा आणि RCBचा माजी कर्णधार विराट कोहली हा गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्मशी झगडताना दिसत होता. गेल्या कित्येक दिवसात विराटला अर्धशतक किंवा शतक करून बॅट उंचावताना चाहत्यांनी पाहिलं नव्हतं. गेल्या काही सामन्यात तर विराट एकेरी धावसंख्येवरच बाद झाला. दोन-तीन सामन्यात तर त्याला पहिल्या चेंडूवर माघारी जावं लागलं. पण अखेर आज त्याला सूर गवसला आणि King Kohli is Back असं चाहत्यांना म्हणण्याची संधी मिळाली. तब्बल १४ IPL इंनिंग्सनंतर त्याला बॅट उंचावण्याची संधी मिळाली. त्याच्या या दमदार कामगिरीनंतर स्टेडियममध्ये उपस्थित त्याची पत्नी अनुष्का शर्मानेदेखील (Anushka Sharma) टाळ्यांचा कडकडाट केला.
विराटने २०१९ नंतर अद्याप शतक झळकावलेले नाही. तसेच, IPL २०२२ सुरू झाल्यापासून विराट कोहलीला अर्धशतकी खेळीही करता आलेली नव्हती. RCBच्या सुरूवातीच्या सामन्यात विराट ४८ धावांवर माघारी परतला होता. पण आज मात्र विराटने संयमी खेळी करत दमदार कामगिरी करून दाखवली. विराटने ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले. या खेळीची सर्वच चाहते खूप वाट पाहत होते. त्याच्या या दमदार कामगिरीनंतर स्टेडियममध्ये उपस्थित त्याची पत्नी अनुष्का शर्मानेदेखील टाळ्यांचा कडकडाट केला.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (क), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (डब्ल्यू), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड