Join us  

KL Rahul on Virat Kohli: विराटबद्दलच्या प्रश्नावर केएल राहुलचं भन्नाट उत्तर; पत्रकारांनाही हसू अनावर

विराट-राहुल जोडीने भारताला दिली होती शतकी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 7:18 PM

Open in App

KL Rahul on Virat Kohli: Asia Cup 2022च्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध १२२ धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाचा आशिया चषकातील प्रवास संपला. आता टीम इंडियाची नजर टी२० विश्वचषकावर आहे. या दरम्यान, विराट कोहलीने टी२० मध्ये टीम इंडियासाठी सलामीला खेळावे का?,  असा प्रश्न पुन्हा एका चर्चेत आला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती मिळाली. त्यामुळे विराट कोहलीने लोकेश राहुलसोबत सलामी दिली. सामन्यानंतर जेव्हा लोकेश राहुलला विचारण्यात आले की विराट कोहलीने आगामी मालिकेत आणि विश्वचषकात सलामीला फलंदाजी करावी का, तेव्हा लोकेश राहुलने मजेशीर उत्तर दिले.

विराटने IPLमध्ये सलामीला उतरल्यानंतर ५ शतके ठोकली आहेत. अफगाणिस्तान विरूद्धचे त्याचे टी२० शतकदेखील सलामीला खेळतानाच साजरे झाले. अशा वेळी विराटने ऑस्ट्रेलिया, आफ्रिका मालिका किंवा आगामी टी२० विश्वचषकात सलामीला उतरावे का?, असा सवाल पत्रकाराने केला. त्यावर लोकेश राहुल म्हणाला, "जर मी स्वतः बाहेर बसलो तर हे शक्य आहे." राहुलच्या या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

मात्र, मजेशीर उत्तरानंतर राहुलने किंग कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. विराट कोहलीने सातत्याने धावा करत राहणे भारतीय संघासाठी खूप चांगले आहे. विराटने अफगाणिस्तान विरुद्ध ज्या प्रकारे खेळी केली, ती खूप चांगली होती. एक संघ म्हणूनही आमच्या खेळाडूचा आत्मविश्वास परत येत आहे हे आमच्यासाठी चांगले आहे. विराट कोहली सलामी करेल, तेव्हाच तो शतक झळकावेल असे नाही. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली तरीही तो अशीच अप्रतिम कामगिरी करू शकतो असा आम्हाला विश्वास वाटतो."

दरम्यान, विराट कोहली IPL मध्ये ओपनिंग करताना अनेक अप्रतिम खेळी केल्या. टीम इंडियासाठी, तो फक्त तिसऱ्या क्रमांकावर खेळतो कारण लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येतो. विराट कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा सलामी केली आहे. त्यात त्याच्या नावावर ४०० धावा आहेत. विराट कोहलीने सलामीवीर म्हणून १ शतक आणि २ अर्धशतके ठोकली आहेत.

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीलोकेश राहुलरोहित शर्मापत्रकार
Open in App