मुंबई - भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झंझावाती शतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. विराटची एकदिवसीय क्रिकेमधील हे 31 वे शतक ठरले. या खेळीबरोबरच विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 49 शतकांसह अव्वलस्थानी आहे. वनडेत सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली 30 शतकांसह रिकी पाँटिंगसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी होता. दरम्यान आज सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना शानदार शतकी खेळी करत विराटने सर्वाधिक शतके फटकावणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. त्याबरोबरच एकदिवसीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय कर्णधार होण्याचा मानही विराटने मिळवला. यंदाच्या वर्षातील आपली एकूण धावसंख्या 1318 वर नेत विराटने मोहम्मद अझरुद्दीनचा भारताकडून कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक 1268 धावा फटकावण्याचा विक्रम मोडीत काढला.
एकदिवसीय कारकिर्दीतील दोनशेवा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या विराट कोहलीने फटकावलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले. खराब सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहलीने केलेली 121 धावांची धडाकेबाज शतकी खेळी भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरली. विराटचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 31 वे शतक होते. या शतकाबरोबरच विराटने वनडेत सर्वाधिक शतके फटकावणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर भारताची खराब सुरुवात झाली. मात्र कर्णधार विराट कोहलीने एक बाजू लावून धरत भारताचा डाव सावरला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगील झाली नाही. 29 धावांतच भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. ट्रेंट बोल्टने धवनला बाद करून भारताला १६ धावांवर पहिला धक्का दिला. धवन १२ चेंडूत १ चौकारासह ९ धावा काढून परतला. त्यानंतर बोल्टने रोहित शर्माला बाद करून टीम इंडियाला दडपणाखाली आणले. रोहितने १७ चेंडूत २ षटकारांसह २० धावा केल्या. त्यानंतर केदार जाधव (12) आणि दिनेश कार्तिक (37) हेसुद्धा माघारी परतले. तर विराटला चांगली साथ देणारा धोनीही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र विराटने एक बाजू लावून घरत संघाचा डाव सावरला.
विराट कोहलीने 121 धावांची शतकी खेळी करताना दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धोनी आणि हार्दिक पांड्याबरोबर छोट्या भागीदाऱ्या करत संघाला. 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट 121 धावा काढून बाद झाला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने फटकेबाजी करत भारताला 280 धावांपर्यंत मजल मारून दिली.