लॉकडाऊनच्या काळात विराट-अनुष्काचा Romantic अंदाज!

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 9240 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा 331 वर गेला आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंचा लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:32 PM2020-04-13T15:32:03+5:302020-04-13T15:32:53+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli share Romantic photo with wife Anushka sharma During Lockdown svg | लॉकडाऊनच्या काळात विराट-अनुष्काचा Romantic अंदाज!

लॉकडाऊनच्या काळात विराट-अनुष्काचा Romantic अंदाज!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सोमवारी पत्नी अनुष्कासोबतचा रोमँटीक फोटो शेअर केला.

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशभरातील क्रीडापटूही पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सुनील गावस्कर, अजिंक्य रहाणे, सौरव गांगुली, गौतम गंभीर, सुरेश रैना आदी क्रिकेटपटूंसह पी व्ही सिंधू, मेरी कोम, बजरंग पुनिया, हिमा दास, सानिया मिर्झा आदी खेळाडूंनीही आपापल्या परीनं केंद्र व राज्य सरकारला आर्थिक मदत केली. विराटनंही पत्नी अनुष्कासह पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला. त्यांनी नेमकी किती मदत केली, हे जाहीर केलं नाही. पण, विरुष्काचं कौतुक झालं.


सध्या लॉकाडाऊनमुळे हे कपल एकमेकांना भरपूर वेळ देत आहेत. सोमवारी विराटनं अनुष्कासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला.

Web Title: Virat Kohli share Romantic photo with wife Anushka sharma During Lockdown svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.