नवी दिल्ली : न्यूझीलंडचा दौरा संपवून भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेशशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील दौऱ्यावर विश्रांती देण्यात आलेले भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. दोन खास मित्रांसह बांगलादेशला जाणार्या किंग कोहलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, विराट कोहलीचेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांच्यासोबत बांगलादेशला रवाना झाल्याचा फोटो समोर आला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात खेळणारे 3 खेळाडू एकाच फोटोत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरसीबीच्या ट्विटर हॅंडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
बांगलादेशचा वनडे संघ -
लिटन दास, अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला.
बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
- 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
- 4 डिसेंबर - पहिला वनडे सामना, ढाका
- 7 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, ढाका
- 10 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, ढाका
- 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
- 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Virat Kohli shares a selfie with Umesh Yadav and Cheteshwar Pujara on tour of Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.