मुंबई : कर्णधार विराट कोहली, सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हे तिघेही भारतीय संघात आहेत. पण तरीही हे तिघे एका वेगळ्याच संघातून एकत्र खेळणार असल्याचे वृत्त आहे. ही स्पर्धा ९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
भारतामध्ये रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला अनन्य साधारण महत्व आहे. या स्पर्धेला ९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेमध्ये दिल्लीचा संघी सहभागी होतो. या स्पर्धेसाठी दिल्लीच्या संभाव्य संघाची निवड करण्यात आली आहे. या संभाव्य संघात कोहली, धवन, इशांत, रिषभ पंत यांना स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघाचे कार्यक्रम सध्या व्यस्त आहे. त्यामुळे कोहली दिल्लीकडून रणजी स्पर्धेत खेळणार की नाही, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. कारण बांगलादेशनंतर आता वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाशी दोन हात करणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन वनडे आणि ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे कोहली रणजी स्पर्धेत खेळणार का, याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे.