Join us  

Big Blow: विराट कोहलीला ICCकडून आणखी एक धक्का; पहिल्या कसोटीतील 'भोपळा' महागात पडला!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला भोपळाही फोडता आला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 2:07 PM

Open in App

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला भोपळाही फोडता आला नव्हता. त्याचा फटका त्याला आयसीसीनं जाहिर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत बसला. याच कसोटीत जसप्रीत बुमराहनं दमदार कामगिरी करून दाखवली होती आणि त्यामुळे तो गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा टॉप टेनमध्ये आला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांनं पहिली कसोटी गाजवली अन् त्याला त्याचा फायदा झाला, तर जेम्स अँडरसननेही आगेकूच केली आहे. ( Virat Kohli slip in ICC Test Batsman ranking; Jasprit Bumrah moves to number 9 in ICC Test bowlers ranking ) 

 India vs England : ICCची कारवाई, भारतीय संघाला जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत बसला मोठा धक्का!

आयसीसीनं गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत गोलंदाजांमध्ये भारताचा आर अश्विन यानं ८५६ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे, तर जसप्रीत बुमराहनं ७६० गुणांसह ९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तो पुन्हा टॉप टेनमध्ये परतला. जेम्स अँडरसन ( ७९५) एक स्थान वर येत सातव्या, तर स्टुअर्ट ब्रॉड ( ७७२) एक क्रमांकाच्या घसरणीसह आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजांमध्ये विराट कोहलीला २१ गुणांचा फटका बसला आहे आणि त्याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी अनुक्रमे सहावे व सातवे स्थान कायम राखले आहे. ( Virat Kohli lost 21 points, Pant lost 6 points and Rohit Sharma got 5 points in ICC Test batsman ranking after the first Test against England) 

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहरोहित शर्मा
Open in App