भारताचा स्टार बॅटर विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा ही भारतीय क्रिकेट संघातील सुपरहिट जोडी आहे. अनेक वर्षांपासून ही जोडी भारतीय क्रिकेट संघासाठी बहुमूल्य योगदान देत आहे. आधी रोहित शर्माविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळायचा. आता रोहित विराटच्या नेतृत्वाखाली खेळतोय. संघातील या बदलासह दोघांच्यात दरी निर्माण झाल्याची चर्चाही रंगली. पण मैदानात दोघांनी वेळोवेळी या चर्चा फोल ठरवल्या. आता आयपीएल स्पर्धे दरम्यान किंग कोहलीनं रोहित शर्मासंदर्भातील बॉन्डिंगची खास गोष्ट शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकमेकांवरील विश्वास
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधी आरसीबीच्या एक्स अकाउंटवरुन विराट कोहलीचा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विराट कोहलीनं आपला टीम इंडियातील सहकारी आणि कॅप्टन रोहित संदर्भात खास गोष्टी शेअर केल्या आहते. संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्यासंदर्भात आम्ही दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवतो, यासह विराट कोहलीने अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.
IPL 2025 मध्ये कुणीच लावली नाही बोली, आता पठ्ठ्याने केली १५० वर्षातील सर्वोत्तम खेळी !
रोहितसंदर्भात काय म्हणाला कोहली?
अनेक वर्षे एकत्र खेळत असल्यामुळे खेळासह बऱ्याच गोष्टी शेअर करणं स्वाभाविक आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही काही गोष्टी एकमेकांकडून शिकलो. आमच्यात एक चांगले बॉन्डिंग तयार झाले. टीम इंडियाकडून १५ वर्षे आम्ही एकत्र खेळू, अशी कल्पनाही केली नव्हती. या प्रवासातील अनेक आठवणी आजही मनात कायम आहेत. पुढेही आम्ही आमच्यातील गोडवा कायम ठेवू, अशा शब्दांत विराट कोहलीनं हिटमॅन रोहित शर्मासोबतचा प्रवास खास आणि अविस्मरणीय आहे, असे म्हटले आहे.
टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर दोघांनी छोट्या फॉर्मेटमधून घेतली निवृत्ती
मागील अनेक वर्षांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. २०१३ आणि २०२५ च्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफी शिवाय या या जोडीनं भारतीय संघाला २०२४ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड स्पर्धा जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोघांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Web Title: Virat Kohli Statement On His Equation With Rohit Sharma Ahead RCB vs MI Clash IPL 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.