मुंबई - बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये पाचव्यावेळी 500 धावांचा टप्पा ओलंडला आहे. आक्रमक फलंदाजी करत समोरील गोलंदाजाची लेंथ बिघडवणाऱ्या विराट कोहली यावर्षी फिरकी पुढे अडखळत खेळताना दिसतोय. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात वेगवेगळ्या संघाच्या फिरकीपटूंनी एक-दोनदा नव्हे तर सातवेळा विराटला तंबूचा रस्ता दाखवलाय.
यावर्षी आयपीएलच्या 13 सामन्यात विराट कोहली दहा वेळा बाद झाला आहे. यामध्ये सात वेळा तो पिरकी गोलंदाजा शिकार ठरला आहे. काल झालेल्या सामन्यात विराट कोहलीला राशिदच्या जादुई स्पिनने बाद केले. खोऱ्याने धावा काढणाऱ्या विराट कोहलीला यावेळी फिरकी गोलंजांना रोखण्यात यश आलं आहे. 13 सामन्यात विराट कोहली तीन वेळा नाबाद राहिला आहे. तर त्याला तीन वेळा वेगवान गोलंदाजाने बाद केले आहे. यावर्षी विराट कोहलीने 13 सामन्यात फलंदाजी करताना 52.60 च्या सरासरीने 526 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीशिवाय रॉबिन उथ्थपा, सुनील नरेन, जोस बटलर आणि पंत हे फलंदाजही तीन ते चारवेळा फिरकी गोलंदाजीचे शिकार झाले आहेत.