Dinesh Karthik vs David Warner, IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिल्ली कॅपिटल्सला शनिवारच्या सामन्यात १६ धावांनी पराभूत केले. RCB कडून दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके ठोकत संघाला १८९ धावांची मजल गाठून दिली. प्रत्युत्तरात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक ठोकले. कर्णधार रिषभ पंतनेही चांगली फटकेबाजी केली. पण पंतचा विराट कोहलीने टिपलेला झेल अधिक चर्चेत राहिला.
१९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यावर मिचेल मार्श (१४), रॉवमन पॉवेल (०), ललित यादव (१), शार्दूल ठाकूर (१७), अक्षर पटेल (१०), कुलदीप यादव (१०) यां साऱ्यांनी निराशा केली. रिषभ पंतने मात्र फटकेबाजी करायला सुरूवात केली होती. पण १७ चेंडूत ३४ धावांवर खेळत असताना विराटने त्याचा उत्तम झेल टिपला. पंतने मारलेला फटका हवेत वेगाने जात होता. त्यावेळी विराटने अचूक टायमिंग साधत झेल घेतला. त्याने टिपलेल्या कॅचचे पत्नी अनुष्कानेही कौतुक केले. तसेच, सामना संपल्यानंतरही विराटने अनुष्काकडे पाहत विजयाचा आनंद व्यक्त केला.
विराटने टिपलेला भन्नाट झेल-
--
अनुष्काने केलं कौतुक! सोशल मीडियावर 'विरूष्का'ची चर्चा-
--
--
--
--
--
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले बंगलोरचे सलामीवीर अनुज रावत (०) आणि डु प्लेसिस (८) स्वस्तात बाद झाले. विराट कोहली (१२) आणि प्रभुदेसाई (६) देखील झटपट माघारी परतले. पण त्यानंतर मॅक्सवेलने शाहबाज अहमदच्या साथीने डाव सावरला. मॅक्सवेलने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने जबाबदारी स्वीकारली. त्याने शाहबाजच्या साथीने ९७ धावांची नाबाद भागीदारी केली. कार्तिकने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा कुटल्या. तर शाहबाजने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ३२ धावा केल्या.