Join us  

इंग्लंड मालिकेत विराट कोहलीचीच कसोटी!

भारत-इंग्लंड यांच्यात आजपासून जेव्हा पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल तेव्हा निश्चितच सर्वाधिक लक्ष असेल ते विराट कोहलीवर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 4:45 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)भारत-इंग्लंड यांच्यात आजपासून जेव्हा पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल तेव्हा निश्चितच सर्वाधिक लक्ष असेल ते विराट कोहलीवर. सन २०१४ ची कसोटी मालिका विराटसाठी खूप निराशादायी व अपयशी ठरली होती तेव्हा ही मालिका त्याच्यासाठी भूतकाळ विसरणारी ठरेल? हाही एक प्रश्न. लक्षात घ्यायला पाहिजे की, समीक्षकांनी विराटच्या कमकुवत बाजूंवरही भाष्य केले आहे. गेल्या दौऱ्यात स्वींग आणि सीम या दोन्हींविरुद्ध तो अपयशी ठरला आहे. त्यावेळी त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती; पण सध्याच्या काळात कोहली हा उत्कृष्ट फलंदाज आहे. जर तो धावा काढत राहिला तर तो जगातील सर्वाेत्तम फलंदाज ठरेल. आता इंग्लंड दौºयात खरे युद्ध आहे ते कोहली आणि ज्यो रूट यांच्यात.मालिकेत दोघांचीही फलंदाजी पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कोहली, रूट, स्टीव स्मिथ, केन विल्यम्सन या एकाच वयोगटांतील खेळाडूंमध्ये एक स्पर्धा आहे की, यापैकी विश्वस्तरीय उत्तम फलंदाज कोण? त्यात भारतीय कर्णधार या मालिकेत कशी कामगिरी करतो ते महत्त्वाचे ठरेल. उत्कृृृष्ट फलंदाज हा स्थितीशी जुळवून, स्वीकारून सर्वत्र धावा करत असतो. कोहलीला सिद्ध करण्याची संधी आहे. इतर फलंदाजांसाठी मात्र हा विषय नसेल.भारतीय कर्णधाराने निदान टी-२०, एकदिवसीय आणि एसेक्सविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली. दिनेश कार्तिकवगळता इतर फलंदाजांनी संघर्ष केला. त्यामुळे व्यवस्थापनापुढेही चिंताच आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या दुखापतीमुळे गोलंदाजी आक्रमण चिंतेचा विषय आहे. जोपर्यंत गोलंदाज २० बळी घेत नाहीत तेव्हापर्यंत संघ सामना जिंकू शकत नाहीत. शास्त्री आणि कोहली यांच्याकडे गोलंदाजीचे पर्याय असले तरी धवन आणि पुजारा हे लवकर बाद होत असतील आणि राहुल, पंत, नायर हे इंग्लंडचा पहिलाच दौरा करत असतील तर कर्णधार आणि कोचपुढे अडचणी वाढतीलच. भारतीय संघाच्या इंग्लंड दौºयाचा कालावधी खूप मोठा आहे.एकदिवसीय मालिकेनंतर त्यांनी पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी एकही सामना खेळलेला नाही. केवळ एकच प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला. एसेक्सविरुद्धचा हा सामनाही तीन दिवसांचा होता; कारण खेळपट्टी व उष्ण वातावरणामुळे तो कमी करण्यात आला होता.१ आॅगस्टपासून सुरू होणाºया या कसोटी सामन्यात भारताजवळ उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक आहेत; कारण काही सराव सामने खेळविले गेले असते तर शास्त्री आणि कोहलीला अंतिम ११ साठी संघाची निवड करणे सोपे गेले असते. मालिकेपूर्वी सराव सामने न खेळणे म्हणजे खेळाडूंना तयार राहावे लागते. आता कोहली-शास्त्री कसोटी मालिकेसाठी संघ निवडीवेळी कुठली रणनीती वापरतात तेही पाहावे लागेल. दोन्ही सराव सामन्यांत अपयशी ठरलेल्या धवनला संधी मिळते की त्याच्याजागी राहुल किंवा पुजारा संघात येतोय? याकडे लक्ष असेल. जर भारतीय संघ दोन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू किंवा दोन वेगवान गोलंदाज आणि दोन मध्यमगती गोलंदाजांसह उतरत असेल तर पांड्या या दोन्ही स्थितीसाठी योग्य आहे; परंतु हे वातावरणावर अवलंबून असेल.उमेश, शमी, ईशांत, अश्विन, जडेजा, कुलदीप यातून कोण गोलंदाजी करणार? सामना सुरू झाल्यानंतर बºयाच गोष्टी उघड होतील. मात्र, गेल्या दोन दौºयांत भारताने जसा संघर्ष केला तसा हा दौरा करायचा नसेल तर अंतिम ११ किंवा बेंचवरील खेळाडूंना सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल, हे निश्चित.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट