नवी दिल्ली : अलीकडेच भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरूद्ध मायदेशात ट्वेंटी-20 मालिका जिंकली. आता भारतीय संघ वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वात 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेशी भिडणार आहे. या मालिकेत विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू दिसणार आहेत. या मालिकेच्या तोंडावर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले.
विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा आणि वामिकासोबत एक फोटो शेअर केला आहे. कोहलीने पंजाबीमध्ये फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले, "देवा, तू एवढे उपकार केले आहेस, आता मी यापेक्षा जास्त काही मागत नाही. फक्त तुझे आभार मानायचे आहेत." विराट उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेत दिसणार आहे. अलीकडेच किंग कोहलीने मैदानावर नवीन वर्ष सुरू करण्यापूर्वी त्याच्या प्रसिद्धीबद्दल एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. ही स्टोरी पाहून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
प्रसिद्धीची लालसा हा एक आजार - विराट कोहली
किंग कोहलीने दिवंगत बॉलीवूड अभिनेता इरफान खान यांनी प्रसिद्धीवर लिहलेली ओळ इंस्टाग्रामवर शेअर केली. विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर इरफान यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहलेल्या चारोळ्या शेअर केल्या. ज्यामध्ये लिहले आहे की, "प्रसिद्धीची इच्छा हा एक आजार आहे आणि एक दिवस मला या आजारापासून मुक्त व्हायचे आहे. जिथे याचा काहीही उपयोग होत नाही, तिथे फक्त आयुष्याचा अनुभव घेणे आणि ठीक असणे पुरेसे आहे."
"ही वेळही निघून जाईल"
याशिवाय माजी भारतीय कर्णधाराने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सचा एक प्रेरणादायी व्हिडीओही शेअर केला. टॉम हँक्सने व्हिडीओमध्ये म्हटले आहे, "मला माहित असते की 'ही वेळ निघून जाईल'. तुला आता वाईट वाटत आहे का? तू थकला आहेस का? तुला राग येतो का? पण ही वेळही निघून जाईल. एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल, तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला सर्व उत्तरे माहित आहेत. आणि शेवटी प्रत्येकाने स्वतःला शोधलेले असते."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Virat Kohli thanked God by sharing a picture with his wife Anushka Sharma and daughter Vamika
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.