जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये बुधवार ७ जून ते ११ जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणारा हा सामना सुरू होण्यास केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल. कारण या सामन्यामध्ये विराट कोहली एक मोठा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. या रेकॉर्डच्या आसपास सध्याच्या काळाता खेळणाऱ्या कुठल्याही खेळाडूला पोहोचता आलेले नाही.
विराट कोहलीने जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ जून ते ११ जून यादरम्यान इंग्लंडविरुद्ध केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ११२ धावा जमवल्या तर तो आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज ठरणार आहे. सध्याच्या काळात खेळत असलेला कुठलाही फलंदाज या विक्रमाच्या आसपासही पोहोचू शकलेला नाही. विराटने हा टप्पा ओलांडला तर तो क्रिकेटच्या इतिहासाच नवा विक्रम रचणार आहे.
जर या सामन्यात विराट कोहलीने ११२ धावा काढल्या तर त्याच्याकडे सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम तोडण्याची संधी असेल. सध्या आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग याच्या नावावर आहे. आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यांतील १८ डावांत त्याने ७३१ धावा काढल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरने १४ डावांमध्ये ६५८ धावा काढल्या आहेत. त्यामुळे या दोघांनाही मागे टाकण्याची संधी विराट कोहलीकडे चालून आलेली आहे.
आयसीसीच्या नॉक आऊस सामन्यांत सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज
१ - रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - १८ डावांमध्ये ७३१ धावा
२ - सचिन तेंडुलकर (भारत) - १४ डावांमध्ये ६५८ धावा
३ - विराट कोहली (भारत) - १५ डावांमध्ये ६२० धावा
Web Title: Virat Kohli to create big record in WTC final?; Sachin will break Ponting's record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.