कोलंबो , दि. 8 - भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या एकमेव टी-20 सामन्यादम्यान सर्वांचं लक्ष भारत हा सामना जिंकून श्रीलंकेला 9-0 ने व्हाइटवॉश देईल का याकडे होतं. भारतीय क्रिकेट संघाने सात गडी राखून हा सामना जिंकला आणि ऐतिहासिक कामगिरी करत श्रीलंकेला कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये 9-0 ने व्हाइटवॉश दिला. मात्र यादरम्यान सामन्याच्या सुरुवातीला एक मोठी चूक झाली होती. टॉस उडवला जात असताना व्यवस्थित संवाद न झाल्याने काहीतरी गैरसमज होऊन ही चूक झाली.
मुरली कार्तिकने दोन्ही संघाचे कर्णधार, मॅच रेफरी अँडी प्रायकॉप्ट आणि टॉस रिप्रेजेंटेटिव्ह गौतम यांना टॉससाठी बोलावलं होतं. उपुल थरंगाने नाणं हवेत उडवलं आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीने हेड्स असा कॉल दिला.
नाणं जमिनीवर पडल्यानंतर मॅच रेफरी अँडी प्रायकॉप्ट बोलले की, टेल्स - इंडिया. यानंतर मुरली कार्तिकने हेड्स असं म्हणत विराट कोहलीशी बातचीत करण्यासाठी माईक पुढे केला. त्याने विराट कोहलीला निर्णय विचारला. आता तुम्ही नीट पाहिलंत तर व्हिडीओमध्ये जेव्हा कॅमेरा कोहली आणि कार्तिकच्या दिशेने वळतो तेव्हा मॅच रेफरी अँडी प्रायकॉप्ट थोडे गोंधळलेले दिसत आहेत. यावरुन काहीतरी गोंधळ झाल्याचं स्पष्ट कळत आहे.
मुरली कार्तिक आणि मॅच रेफरी अँडी प्रायकॉप्ट यांच्यामध्ये व्यवस्थित संवाद न झाल्याने हा सगळा गोंधळ झाला. आता नेमका कोण चुकलं आणि कोण बरोबर आहे ते कळलं नाही. पण ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली एवढं मात्र नक्की, पण असं होतं तर मग अँडी प्रायकॉप्ट यांनी पुढे येऊन आक्षेप का घेतला नाही ? हा प्रश्नदेखील महत्वाचा आहे.
विराट कोहलीने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी करत 7 गडी गमावत 170 धावसंख्या केली होती. भारताने 19.2 ओव्हर्समध्येच तीन गडी राखून विजय मिळवला.
गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहली (८२) आणि मनीष पांडे (५१*) यांनी दिलेल्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर भारताने एकमेव टी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेचा ७ विकेटने धुव्वा उडवला. यासह भारताने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर एकमेव टी-२० सामन्यातही दबदबा राखताना लंका दौºयात ९-० अशी विजयी कामगिरी केली. लंकेने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना भारताने १९.२ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात बाजी मारली. टीम इंडियाने या दौºयात श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी, ५ वन-डे व १ टी-२० हे सर्व सामने जिंकून ९-०ने टूरवॉश दिला.
Web Title: Virat Kohli took the toss in a T20 match despite Sri Lanka's victory?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.