दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याला इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सोमवारी विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यापैकी पसंतीचा क्रिकेटपटू कोण असा सवाल करण्यात आला. झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू मपुमेलेलो मबांग्वा यांच्याशी तो चर्चा करत होता. एबी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात विराटसह खेळतो आणि त्यानं स्मिथ व विराट यांच्यात RCBच्या कर्णधाराची निवड केली. यावेळी सचिन आणि विराट यांची तुलना करताना त्यानं धावांचा पाठलाग करण्यात विराट हा सचिनपेक्षा सरस असल्याचे मत व्यक्त केलं.
माझा मुलगा एवढाही वयस्कर झालेला नाही; व्हायरल फोटोवर MS Dhoniच्या आईची प्रतिक्रिया
तो म्हणाला,'' विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील एकाची निवड करणे अवघड आहे. हे दोघंही नैसर्गिक खेळ करण्यात तरबेज आहेत. टेनिसच्या भाषेत सांगायचे तर, विराट हा रॉजर फेडररसारखा आहे, तर स्मिथ राफेल नदालसारखा आहे. स्मिथ मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि धावा कशा कराव्यात, हे तो शोधून काढतो. पण, मी विराटची निवड करेन. त्यानं जगभरात धावा केल्या आहेत. तणावातही त्याने सामने जिंकले आहेत.''
विराट की सचिन? या प्रश्नावर एबी म्हणाला,''विराट आणि माझ्यासाठी सचिन हा आदर्श आहे. त्यानं त्याचा काळ गाजवला आहे. खूप यश मिळवलं आहे आणि युवा खेळाडूंसाठी तो एक प्रेरणास्थान आहे. विराटचंही हेच मत असेल. पण, जेव्हा धावांचा पाठलाग करण्याचा प्रश्न असेल तेव्हा मी विराटची निवड करेन. प्रतिस्पर्धींनी 330 धावा केल्या तरी विराट ते लक्ष्य सहज पार करू शकतो. सचिन सर्व प्रकारच्या क्रिकेटमधला दमदार खेळाडू आहे, परंतु धावांचा पाठलाग करण्यात विराट सरस ठरतो.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
... म्हणून हा सर्व आटापिटा; IPL 2020 रद्द होणं BCCIला परवडणारं नाही!
85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान
Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!
वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला
महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा
2008 मध्ये धोनीने कप्तानपद सोडण्याची दिली होती धमकी?, आरपी सिंगने सांगितले यामागील सत्य!