मुंबई - ताज्या घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ट्विटरवर 2017 मध्ये बाहुबली 2 हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही चर्चा रंगल्या. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्कानं इटालीमध्ये लग्न केलं. लग्नानंतर विरट कोहलीनं केलेलं ट्विट यावर्षीच सर्वाधिक रीट्वीट करण्यात आले. विरुष्काच्या चाहत्यानी त्यांच्यावर शुभेच्छा पाऊस पाडला. दक्षिण भारतातील सूर्या शिवकुमारच्या चित्रपटाच्या पोस्टरचे छायाचित्र असलेले ट्वीट यापूर्वी ‘गोल्डन ट्वीट’ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र वर्षभराच्या शेवटी विराटनं केलेल्या ट्विटने धुमाकूळ घातला.
''आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन घेतलं....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' असं ट्विट विराट कोहलीनं केलं होतं'
वर्षभरात भारतीयांनी केलेल्या ट्वीटमध्ये कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा रंगली याबाबत ट्विटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मनोरंजन विभागात बाहुबली २ सर्वाधिक चर्चा झालेला विषय असल्याचे समोर आले आहे. तर वृत्त आणि राजकारण या विभागात जीएसटी आणि मन की बात हे दोन हॅशटॅग ट्रेण्डिंग होते. मनोरंजन क्षेत्रात या वर्षी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने बाजी मारली आहे. दक्षिण भारतातील सूर्या शिवकुमारच्या चित्रपटाच्या पोस्टरचे छायाचित्र असलेले ट्वीट ‘गोल्डन ट्वीट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे 2017 मध्ये हे ट्वीट सर्वाधिक रीट्वीट करण्यात आले.
क्रीडा विभागात भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक दहा लाख 80 हजार ट्वीट झाले. तर सर्वाधिक अनुयायी असलेल्या ट्विटरतींच्या यादीत प्रथमच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. देशातील सामाजिक घडामोडींवरही या व्यासपीठावर चर्चा रंगली. यामध्ये तिहेरी तलाक या विषयावर सर्वाधिक ट्वीट करण्यात आले.
सनी लिओनी गेल्या पाच वर्षांपासून टॉप सर्चमध्ये कायम
गुगलच्या सर्चमध्ये सर्वाधिक वेळा सर्च केल्या गेलेल्या मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींमध्ये अभिनेत्री सनी लिओनी गेल्या पाच वर्षांपासून कायम आहे. तिच्यानंतर अभिनेत्री अर्शी खानचा क्रमांक लागतो. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये झळकलेली अभिनेत्री दिशा पटाणीनेही टॉप 5 मध्ये प्रवेश मिळवला आहे