Join us  

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: 'आपण जे काही ऐकतो ते...'; गौतम गंभीर अन् नवीन उल हकसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने सोडलं मौन, पोस्ट चर्चेत

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: गौतम गंभीर आणि नवीन उल हकसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 11:50 AM

Open in App

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: आरसीबी आणि लखनौचा सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादामुळे गाजला. लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ विरोधात विराट कोहली फिल्डिंग करताना उत्साहित दिसला. 

विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.

लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ विरोधात विराट कोहली फिल्डिंग करताना उत्साहित दिसला. प्रत्येक सामन्यानंतर जणू बेंगलोरमधील पराभवाचा वचपा काढत होता. विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.

सदर प्रकरणानंतर आयपीएल व्यवस्थापनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल- हक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीरवर मॅच फीसच्या १०० टक्के रकमेचा दंड त्याच्यावर लावण्यात आला. तर नवीन उल हक याला सुद्धा मॅच फीमधील ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

गौतम गंभीर आणि नवीन उल हकसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर रोमनचे सम्राट Marcus Aurelius यांच्या काही लाईन्स पोस्ट करत विराट कोहली म्हणाला की, 'आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.' (Everything we hear is an opinion, not a fact. Everything we see is a perspective, not the truth.)

दरम्यान, लंका प्रिमियर लीगमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीसोबतही नवीन उल हकचा वाद झाला होता. नवीन-उल-हकनं  मोहम्मद आमीरप्रती अपशब्द वापरले आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना भांडणासाठी उभे राहिले. अन्य सहकाऱ्यांनी त्यांना दूर नेले. इथेच हा वाद संपला नाही, तर २० व्या षटकात आमीरनं षटकार खेचला आणि नवीनकडे तो रागाने पाहत काहीतरी बोलला. पुन्हा एकदा सहकाऱ्यांनी दोघांना शांत केले. पण, सामना संपल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू एकमेकांशी हात मिळवत होते, तेव्हा आफ्रिदीनं नवीन-उल-हकला झापलं. नवीन समोर येण्यापूर्वी आफ्रिदी प्रतिस्पर्धी संघातील अन्य खेळाडूंशी हसून गप्पा मारत होता. पण, नवीन समोर येताच आफ्रिदीचा पारा चढला, क्या हो गया? असं त्यानं रागात विचारले. पुढे तो हेही म्हणाला, मी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता.

नवीन उल हक कोण आहे?

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने लखनौ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा तो अफगाणिस्तानचा सहावा खेळाडू आहे. नवीन उल हकची टी-२० कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३४ विकेट घेतल्या आहेत. लखनौ संघाला नवीन-उल-हककडून मोठ्या आशा होत्या. त्या आशेप्रमाणेच नवीन उल हकने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्स पटकावल्या.

टॅग्स :विराट कोहलीगौतम गंभीरआयपीएल २०२३
Open in App