IPL 2023: IPL 2023 च्या हंगामात दररोज एकापेक्षा एक उत्कंठवर्धक सामने पाहायला मिळत आहेत. पण, 1 मे रोजी RCB आणि LSG दरम्यान झालेल्या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरुने सामना जिंकल्यानंतर लखनौचा नवीन उल हक आणि विराटचा वाद झाला, या वादात गंभीरने उडी घेतली.
वाद इतका वाढला की, इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. विशेष म्हणजे, यापूर्वीही अनेकदा गंभीर आणि कोहलीमध्ये अशाप्रकारचे वाद झाले आहेत. या वादाची सुरुवात IPL 2013 मध्ये झाली होती. दरम्यान, कालच्या वादामुळे सोशल मीडियावर मीम्सचा भडीमार झाला आहे. ट्विटरवर Kohli Vs Gambhir ट्रेंड करत आहे.
ट्विटर असो वा फेसबूक क्रिकेट फॅन्स मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. कोहली-गंभीर वादावरुन क्रिकेटचे मैदान, युद्धाचे मैदान झाले, अशी प्रतिक्रिया येत आहे.
1 मे रोजी लखनौच्या इकाना स्टेडियमवर रॉयल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) दरम्यान, IPL 2023 चा 43वा सामना झाला. या सामन्यात RCB ने बाजी मारली. या सामन्यानंतर हस्तांदोलन करताना नवीन उल हकचा विराटसोबत वाद झाला.
त्याच्या वादानंतर गंभीरने या वादात उडी घेतली आणि त्याची कोहलीसोबत बाचाबाची झाली. या दोन्ही दिल्ली बॉईजला सोडवण्यासाठी दोन्ही संघातील इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.
यापूर्वी 2013 मध्ये RCB आणि KKR यांच्यात झालेल्या सामन्यात गंभीर KKR कडून खेळत होता. तेव्हाही त्याची कोहलीसोबत अशाच प्रकारचा वाद झाला होता. त्या दिवसापासून दोघांमध्ये वाद काम राहिला.
या वादावर एका युजरने लिहिले की, ग्राउंडवर गल्लीतील भांडणासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुसऱ्याने लिहिले- दोन दिल्ली बाईजमुळे वातावरण गरम झाले.
तिसऱ्याने लिहिले- लो स्कोअरिंग सामन्यामुळे जितकी चर्चा झाली नाही, तितकी या दोघांच्या भांडणामुळे झाली.
आणखी एकाने लिहिले- इथे काय गँग्स ऑफ वासेपूरची शूटिंग सुरू आहे का? आणखी एकाने लिहिले- हाणामारी होता होता राहिली...
या भांडणानंतर IPL मॅनेजमेंटने तिघांवर दंड लावला. कोहली आणि गंभीरवर 100 टक्के मॅच फी आणि नवीन उल हकवर 50 टक्के मॅच फीचा दंड लावण्यात आला.
Web Title: Virat Kohli Vs Gautam Gambhir: Kohli-Gambhir clashed on the field, memes circulated on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.