Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराट सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड कधी मोडणार? गावस्करांनी केली मोठी भविष्यवाणी...

Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराट कोहलीने श्रीलंकेविरोधात आपल्या करिअरमधील 46वे शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 03:17 PM2023-01-16T15:17:34+5:302023-01-16T15:17:53+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli vs Sachin Tendulkar: When Will Virat Break Sachin Tendulkar's Record of 100 Centuries? Gavaskar made a big prediction... | Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराट सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड कधी मोडणार? गावस्करांनी केली मोठी भविष्यवाणी...

Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराट सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड कधी मोडणार? गावस्करांनी केली मोठी भविष्यवाणी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli vs Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या 100 शतकांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. तिरुअनंतपुरम वनडेमध्ये कोहलीच्या श्रीलंकेविरुद्धच्या 160 धावांच्या खेळीनंतर गावस्करांनी हे विधान केलं आहे. कोहलीचे हे वनडेतील 46 वे शतक होते. तसेच, एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73वे शतक ठरले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर विराट सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 100 शतकांचा विक्रम आहे. गावस्कर म्हणाले की, विराट ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, त्याच्याकडे पाहता विराट आयपीएलपूर्वीच सचिन तेंडुलकरचा वनडेमधील शतकांचा विक्रम मोडीत काढेल. सचिनच्या नावावर वनडेमध्ये 49 शतके आहेत, तर विराटने 46 शतके झळकावली आहेत.

इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, 'विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तो असाच खेळत राहिला तर लवकरच सचिनचा रेकॉर्ड मोडित काढेल. न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही तीन एकदिवसीय सामने आहेत. म्हणजे आयपीएलपूर्वी 6 एकदिवसीय सामने आहेत. सचिनची बरोबरी करण्यासाठी विराटला आणखी 3 शतके आवश्यक आहेत. तो आता ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो आयपीएलपूर्वीच सचिनचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडेल, असे मला वाटते.

विराट 40 पर्यंत खेळला तर...
एवढंच नाही तर गावस्कर यांनी विराटबाबत आणखी एक मोठी भविष्यवाणी केली. कोहली सचिनचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही मोडू शकतो याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. गावसकर म्हणाले, विराटने पुढील 5 ते 6 वर्षे क्रिकेट खेळल्यास सचिनचा हा विक्रम तो मोडू शकतो. त्याची सरासरी दरवर्षी 6-7 शतके आहे. वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत खेळला तर पुढील 4-5 वर्षांत तो शतकांच्या बाबतीत सचिनच्या पुढे जाईल.

Web Title: Virat Kohli vs Sachin Tendulkar: When Will Virat Break Sachin Tendulkar's Record of 100 Centuries? Gavaskar made a big prediction...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.