Join us  

विराट कोहली Vs शाहरूख खान... ट्विटरवर झाला 'ई-राडा'! दोघांचे फॅन्स भिडले, कारण काय...

Virat Kohli vs Shahrukh Khan: शाहरूख खान आणि विराट कोहली यांच्यातील नातेसंबंध चांगले असले तरी चाहते वेगळ्याच कारणावरून भिडल्याचे दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:07 PM

Open in App

Virat Kohli vs Shahrukh Khan, Fans Fight Arguments: देशातील दोन मोठे सुपरस्टार, अभिनेता शाहरुख खान आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यातील नातेसंबंध भलेही सौहार्दपूर्ण असतील, पण त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या मतभेद आहेत. जवळपास दोन दिवसांपासून शाहरुख आणि विराटचे चाहते ट्विटरवर एकमेकांविरोधात ट्विट करत आहेत. दोघांची फॅन आर्मी आपल्या आवडत्या स्टारला बेस्ट म्हणण्यावर भर देताना दिसत आहे. काहीजण शाहरुख खानच्या अभिनयाबद्दल आणि त्याच्या जगभरातील प्रसिद्धीबद्दल बोलत आहेत, तर काहीजण विराट कोहलीच्या स्टारडम आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सचा हवाला देत त्याला शाहरुखपेक्षा मोठा स्टार म्हणत आहेत. ट्विटरवर सुरू असलेल्या या ट्रेंडमध्ये अनेक चाहते वादग्रस्त ट्विटही करताना दिसत आहेत.

दोन्ही स्टार्सचे चाहते एकमेकांवर तुटून पडले...

शाहरुख खानच्या एका चाहत्याने लिहिले, "प्रत्येकजण शाहरुखची इतरांशी तुलना का करतो? शाहरुख Vs बॉलीवूड, दक्षिणात्य कलाकार, राजकारणी, क्रिकेटर्स... सर्वांशी त्याची तुलना का होते, कारण तो सर्वोत्कृष्ट आहे हे सर्वांना माहीत आहे."

शाहरुखने कोहलीबद्दल केलेल्या एका ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर करत विराटच्या एका चाहत्याने उत्तर दिले, "शाहरुखचे सर्वात जास्त आवडलेले ट्विट विराट कोहलीबद्दल होते. ही त्याची पातळी आहे. विराट कोहली, सर्वात बेस्ट"

पाहा आणखी काही ट्विट्स-

शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर जगभरात आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला पठाण चित्रपटाने जगभरातील सर्व विक्रम मोडले आणि सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. पण काहींनी त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. तर काहींना विराटलाही ट्रोल केले.

----

एका युजरने दोन्ही गटांना सुनावले...

ट्विटरवर सुरू असलेल्या या संपूर्ण वादामध्ये अनेक लोक शांततेचे आवाहन करत आहेत. एका यूजरने लिहिले, "कोणाचाही अपमान करण्याचा हेतू ठेवू नका. विराट कोहली आणि शाहरुख खान हे दोघेही भारताची शान आहेत. दोघेही जगात देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही बालिश भांडणे थांबवा."

विराट कोहली हा देशातील सर्वात मोठा क्रिकेटपटू आहे. कोहलीने आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि T20 मध्ये 71 शतके झळकावली आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 242 मिलियन फॉलोअर्स आहेत. अशा परिस्थितीत विराटही मोठा स्टार आहे. तर शाहरुख तीन दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे आणि इंस्टाग्रामवर त्याचे 37 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :विराट कोहलीशाहरुख खानबॉलिवूडट्विटरभारतीय क्रिकेट संघ
Open in App