नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील खेळाडूंना थेट वॉर्निंग दिली आहे. तुम्हाला जेवढी संधी मिळेल, त्यामध्ये स्वत: ला सिद्ध करा नाही तर संघातील तुमचे स्थान अबाधित राहू शकत नाही, असे कोहलीने सांगितले आहे.
आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक लक्षात ठेवून कोहलीने खेळाडूंना हे सांगितल्याचे समजत आहे. आतापासून विश्वचषकापर्यंत जवळपास 30 ट्वेन्टी-20 सामने खेळवले जाणार आहे. या 30 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये बहुतांशी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. संधी मिळाल्यानंतर खेळाडूंनी जर आपली छाप पाडली नाही तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवता येऊ शकतो.
विश्वचषकापर्यंत भारताला 30 ट्वेन्टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला जवळपास 4-5 सामने खेळायला मिळतील. या 4-5 सामन्यांमध्ये खेळाडूकडून दमदार कामगिरी झाली नाही तर त्याला संघातून काढण्यात येईल, असे कोहलीने सांगितले आहे.
Web Title: Virat Kohli warns players; ... otherwise take the exit from the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.