VIDEO: शेवटच्या सामन्यात आशिष नेहराने केलेली फिल्डिंग पाहून विराट कोहलीही झाला आश्चर्यचकित

चेंडू आशिष नेहराकडे आला असता ज्याप्रकारे त्याने खाली न झुकता तो अडवला ते पाहून विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला आणि कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 01:39 PM2017-11-02T13:39:32+5:302017-11-02T13:43:30+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli was surprised to see the fielding of Ashish Nehra in the last match | VIDEO: शेवटच्या सामन्यात आशिष नेहराने केलेली फिल्डिंग पाहून विराट कोहलीही झाला आश्चर्यचकित

VIDEO: शेवटच्या सामन्यात आशिष नेहराने केलेली फिल्डिंग पाहून विराट कोहलीही झाला आश्चर्यचकित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतीय संघाने दिल्ल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली. या सामन्यात सर्वांचं लक्ष होतं ते आपला अखेरचा सामना खेळणा-या आशिष नेहराकडे. यावेळी आशिष नेहरानेही आपल्या क्षेत्ररक्षणाने युवा खेळाडूंना आश्चर्यचकित केलं. 

सतराव्या ओव्हरला जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. यावेळी चेंडू आशिष नेहराकडे आला असता ज्याप्रकारे त्याने खाली न झुकता तो अडवला ते पाहून विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला आणि कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. झालं असं की, आशिष नेहराने पायाच्या सहाय्याने चेंडू हवेत उडवला आणि पकडला. आशिष नेहराचं हे कौशल्य पाहून विराट कोहली भलताच खूश झाला आणि कौतुक केलं. दुसरीकडे युजवेंद्र चहलही टाळ्या वाजवून कौतुक करत होता. 

आशिष नेहराचं हे कौशल्य पाहून अनेकांना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची आठवण झाली. मोहम्मद अझरुद्दीनही अनेकदा अशाचप्रकारे बॉल उचलत असे. महत्वाचं म्हणजे आशिष नेहराने 1999 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या कॅप्टन्सीमध्येच आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आणि आपल्या करिअरमधील शेवटच्या सामन्यात हे कौशल्य दाखवत आशिष नेहराने प्रेक्षकांची मने जिंकली.



 

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाचा पराभव केला. याआधी झालेल्या ६ टी-२० सामन्यांत न्यूझीलंडने ५ वेळा बाजी मारली असून एका सामन्याचा निर्णय लागला नव्हता. यासह विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोपही दिला.

नेहराचा १८ वर्षांचा रोमांचक प्रवास
भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा न्यूझीलंडविरोधातील सामन्यानंतर निवृत्त झाला. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात १९९९ मध्ये कसोटी पदार्पण करणाºया आशिष नेहराने २००४ नंतर कसोटी, तर २०११ च्या विश्वचषकातील सामन्यानंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही. २००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. त्याने २७ टी-२० सामन्यांत ३४ बळी मिळवले आहेत. आश्विनने ५२, तर बुमराहने ३८ बळी घेतले आहेत. नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४, तर १२० एकदिवसीय सामन्यांत १५७ गडी बाद केले आहेत.
 

Web Title: Virat Kohli was surprised to see the fielding of Ashish Nehra in the last match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.