मुंबई: अनुष्का शर्माचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट म्हणून सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला 'परी' नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी ट्रेलर्समुळे या हॉररपटाने चांगलीच हवा निर्माण केली होती. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले होते.
सामान्य प्रेक्षकांबरोबरच विराट कोहली यालाही अनुष्काचा हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. अखेर त्याने गुरुवारी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये कोहलीने म्हटले आहे की, कालच मी परी बघितला. हे माझ्या पत्नीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट काम आहे. परी हा तिच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. मी अनुष्काची भूमिका पाहून खूपच घाबरलो. मात्र, मला तिचा अभिमान वाटतो, असे विराटने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी अनुष्का शर्माने 'फिल्लौरी' या चित्रपटातही भूताची भूमिका साकारली होती. मात्र, ते पात्र काहीसे गमतीशीर होते. परंतु 'परी'मधील भूमिका त्याच्या अगदी उलट होती. भयपटातील तिच्या लूकची चांगलीच चर्चाही रंगली होती. प्रसिद्ध ब्रिटीश प्रोस्थेटिक डिझायनर क्लोवर वूटनने तिचा मेकअप केला होता. अनुष्का साकारत असलेली रुक्साना बऱ्याच शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरी गेलेली असते. हीच गोष्ट लक्षात ठेवत तिचा लूक ठरवण्यात आला. विस्कटलेले केस, कोरडी त्वचा आणि घाबरवणाऱ्या लूकसोबतच तितकाच आकर्षक चेहरा वाटला पाहिजे, याची काळजी घेण्यात आल्याचे क्लोवर हिने सांगितले होते.
Web Title: Virat kohli watch Anushka Sharma's Pari Movie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.