IPL 2023 मधील गौतम गंभीरसोबतच्या 'राड्या'नंतर विराट कोहली पत्नीसह देव दर्शनाला, Video Viral

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये माजी सलामीवीर गौतम गंभीरसोबत झालेल्या ( Virat Kohli vs Gautam Gambhir) राड्यामुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:34 PM2023-05-03T18:34:56+5:302023-05-03T18:40:37+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli went-to-temple-with-Wife anushka-sharma-after-controversy-with-gautam-gambhir-in-ipl-2023 Video  | IPL 2023 मधील गौतम गंभीरसोबतच्या 'राड्या'नंतर विराट कोहली पत्नीसह देव दर्शनाला, Video Viral

IPL 2023 मधील गौतम गंभीरसोबतच्या 'राड्या'नंतर विराट कोहली पत्नीसह देव दर्शनाला, Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये माजी सलामीवीर गौतम गंभीरसोबत झालेल्या ( Virat Kohli vs Gautam Gambhir) राड्यामुळे चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यानंतर हे सर्व नाट्य घडले होते. त्यानंतर बीसीसीआयनेही कारवाई करताना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना १००% मॅच फी रक्कम, तर नवीन उल हकला ५०% मॅच फी रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली. या विराट व गौतम या दोघांवर अनेक दिग्गजांनी टीका केलीय... वीरेंद्र सेहवागने तर हे असे कसे आदर्श, असा सवाल उपस्थित करताना बंदीची मागणी केली. 

विराटने या वादानंतर जे दिसतं तसं नसतं अशी इस्टा स्टोरी पोस्ट केली होती आणि आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. विराट व बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघं त्या भांडणानंतर मंदिरात गेले असल्याचा दावा या व्हिडीओतून केला गेला आहे. विराट-अनुष्का यापूर्वीही अनेकदा मंदिरात गेले आहेत आणि त्यांनी तेथे पूजा अर्चनाही केली होती. 



अनेक लोक या व्हिडिओला जुना म्हणत आहेत. याआधीही अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा नीम करोली बाबाच्या दरबारातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनुष्का शर्माने २०१७ मध्ये इटलीमध्ये विराटसोबत लग्न केले, तिने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुलगी वामिकाला जन्म दिला.अनुष्का शर्मा 'चकडा एक्स्प्रेस' या चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित चकडा एक्सप्रेस, झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे, जी २०१२ मध्ये पद्मश्री मिळवणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली. 'चकडा एक्सप्रेस'चे शूटिंग भारत आणि ब्रिटनमध्ये झाले आहे. 

LSG vs RCB सामन्यानंतर नेमकं काय घडलं?
-  कायले मायर्स विराटसोबत गप्पा मारताना गंभीर तेथे आला अन् LSGच्या फलंदाजाला घेऊन गेला. 
 - त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असताना वादाची पहिली ठिणगी पडली
- LSGचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले
- विराटने तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले अन् हे पाहून नवीन अंगावर धावला, परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले
- हा वाद पाहताच गौतम गंभीर पुन्हा आक्रमक पवित्र्यात गेला अन् दूरूनच विराटवर खवळला
- लोकेश राहुलसह लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विराटपर्यंत पोहोचला
- त्यानंतरही विराट शांततेने त्याच्याशी बोलताना दिसला, परंतु गंभीरचा पारा चढाच होता.

- पण खरं भांडण जेव्हा नवीन बाद होऊन माघारी जात होता तेव्हाच सुरू झालं होतं.. विराट त्याला काहीतरी म्हणाला होता.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Virat Kohli went-to-temple-with-Wife anushka-sharma-after-controversy-with-gautam-gambhir-in-ipl-2023 Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.