Join us  

21 धावांवर बाद झाला कोहली, तरीही केला हा 'विराट' विक्रम

येथे सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार विराट कोहली 21 धावांवर बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 7:46 PM

Open in App

बंगळुरु - येथे सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्याला नाथन कूल्टर नाईलनं बाद केलं. कर्णधार म्हणून सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी. डीव्हिलियर्स याच्या नावावर होता. माजी कर्णधार एम. एस. धोनीनं कर्णधारपदाचा राजिनामा दिल्यानंतर पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर आली होती. कर्णधार म्हणून खेळताना कोहलीनं 36 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार केला. ए.बी. डीव्हिलियर्स (41), क्लार्क (47), धोनी/मॉर्गन (48), गांगुली/इंझमाम (49) आणि व्ही. रिचर्डस् (50) यांच्या नावावर हा विक्रम होता. कोहलीनं आज 21 चेंडूत 21 धावांची खेळी केली. मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले असले तरी त्यानं ह्या नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बंगळुरुत सुरु असलेल्या वन-डेच विजय मिळवून विराटसेनेला सुमारे दहा वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडता येईल. दहा वर्षानंतर सलग ९ एकदिवसीय सामने जिंकण्याचा पराक्रम करता येईल. . बंगळुरुमध्ये ऑसीला नमवून हाच विक्रम मागे टाकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. ऑस्ट्रेलियाने सलग १० सामने जिंकण्याचा पराक्रम ६ वेळा केला आहे.

उमेश यादवचे 100 बळी पूर्णदीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेला भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादवने आज नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बंगळुरुत ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात त्यानं आपल्या वन-डे कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत. कांगारुंचा कर्णधार स्मीथला बाद करताच त्याच्या नावार हा विक्रम झाला. वन-डेमध्ये 100 बळी घेणारा तो भारताचा 18 वा गोलंदाज आहे. त्यानं हा पराक्रम 71 व्या सामन्यात केला आहे. भारताकडून सर्वात कमी वन-डे सामन्यात 100 बळी पूर्ण करण्याच्या यादीत उमेश सहाव्या स्थानावर आहे. सर्वात कमी वन-डेत 100 बळी घेण्याचा विक्रम इरफान पठानच्या नावावर आहे. इरफाननं 59 वन-डेत 100 बळी घेतले आहेत. त्यानंतर जहीर खान (65), अजित अगरकर (67), जवागल श्रीनाथ (68) आणि इशांत शर्मा (70) यांचा क्रमांक लागतो. 

100 व्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर 100 वा सामना खेळणारा तो ऑस्ट्रेलियचा 28 खेळाडू ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथचा 100 सामना होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगनं 374 सामने खेळले आहेत. बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत वॉर्नरनं 103चेंडूचा सामना करताना आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्यानं 10 चौकार आणि 3 षटकार लगावले.