Join us  

Virat Kohli Wicket Controversy: आधी नडला, मग मैदानातच अंपायर्सशी भिडला.... विराट कोहलीच्या विकेटवरून राडा अन् नवा वाद

Virat Kohli Wicket Controversy, IPL 2024 KKR vs RCB: विराटला बाद ठरवल्यानंतरही त्याने मैदानावरील दोन्ही पंचांशी हुज्जत घातली. तसेच डगआऊट मध्ये गेल्यावरही विराटने राग व्यक्त केला. त्यावरून सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 6:17 PM

Open in App

Virat Kohli Wicket Controversy, IPL 2024 KKR vs RCB: कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना तुफान फटकेबाजीच्या जोरावर ६ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २२२ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याशिवाय फिल सॉल्टनेही ४८ धावा केल्या. RCB ने यंदाच्या हंगामाता चौथ्यांदा २००हून अधिक धावा दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने दमदार सुरुवात केली होती. पण हर्षित राणाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याच्या बाद होण्याची पद्धत विचित्र तर होतीच पण त्यावरून मैदानात बराच वाद निर्माण झाला. इतकेच नव्हे तर आता सोशल मीडियावरही याबद्दल चर्चा पाहायला मिळत आहे.

विराट कोहलीच्या विकेटबद्दल नक्की काय घडले?

विराटच्या विकेट वरून मैदानात तुफान गोंधळ दिसून आला. हर्षित राणा ने टाकलेला चेंडू हा फुल टॉस होता. तो चेंडू विराटच्या कमरेच्या उंचीपर्यंत गेला. विराटने शॉट खेळताना शॉट चुकल्याने चेंडू बॅटला लागून हवेत उडाला आणि हर्षित राणाने त्याच्या स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पूर्ण केला. त्यानंतर विराट कोहली बाद असल्याचा निर्णय पंचांनी दिला. पंचांच्या या निर्णयाला विराट कोहलीने DRSने आव्हान दिले, परंतु DRS घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांनी देखील चेंडू योग्य पद्धतीने टाकला असल्याचे सांगत मैदानावरील पंचांचा निर्णयच कायम ठेवला आणि विराटला बाद घोषित केले.

--

खरे पाहता, विराट क्रिजच्या पुढे येऊन खेळत असल्याने आणि स्वतःच्या पायांच्या बोटावर उभा असल्याने त्याची उंची वाढली आणि त्यामुळे हा चेंडू कमरेच्या उंचीपेक्षा वरती असणे अपेक्षित आहे व त्यामुळे तो 'नो- बॉल' दिला जायला हवा असा युक्तिवाद विराट करत असल्याचे दिसून आले. तिसऱ्या पंचांनी विराटला बाद ठरवल्यानंतरही विराटने मैदानावरील दोन्ही पंचांशी हुज्जत घातली. तसेच डग आऊट मध्ये गेल्यावरही विराटने आपला राग व्यक्त केला. या विकेटवरून समालोचकांनी देखील विराट नाबाद असल्याचे मत नोंदवले. तसेच सोशल मीडियावरही यावरून बरीच चर्चा सुरु असल्याचे दिसून आले आहे.

--

--

--

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स