भारतात परतलेला विराट कोहली कसोटी मालिका खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स

IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 02:35 PM2023-12-22T14:35:29+5:302023-12-22T14:35:59+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli will join Team India in South Africa today and he will be available for the first Test Match | भारतात परतलेला विराट कोहली कसोटी मालिका खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स

भारतात परतलेला विराट कोहली कसोटी मालिका खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA Test Series  (Marathi News)  : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. नंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली वन डे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. आता २६ डिसेंबरपासून सुरू होणारी कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवण्याचा रोहित शर्मा अँड टीमचा निर्धार आहे. पण, पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. इशान किशनने कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली, मोहम्मद शमीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यात दुसऱ्या वन डेत जखमी झालेल्या ऋतुराज गायकवाडनेही कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. विराट कोहलीही ( Virat Kohli) कौटुंबिक कारणास्तव भारतात परतला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळेल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. 


वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह विश्रांतीवर गेले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ते पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहते आनंदात आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ कसोटींत १२३६ धावा करताना ३ शतकं झळकावली आहेत. नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेत विराटची बॅट चांगलीच तळपली आहे. ७ कसोटी त्याने ५१.३५ च्या सरासरीने ७१९ धावा केल्या आहेत. त्यामुळे या कसोटी मालिकेत त्याच्या फटकेबाजीसाठी सारे सज्ज आहेत.


विराट कोहली पहिली कसोटी खेळेल का?
विराट कोहली ३ दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणास्तव भारतात परतला होता. तो शुक्रवारी म्हणजे आज पुन्हा आफ्रिकेसाठी रवाना होणार असल्याचे ताजे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जोहान्सबर्ग कसोटीत उपलब्ध असणार आहे. 


भारताचा कसोटी संघ  - रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. श्रेयस अय्यर,  लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत  
 

Web Title: Virat Kohli will join Team India in South Africa today and he will be available for the first Test Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.