- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण लिहितात...
भारताला सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी आॅस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात शानदार झाली. १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी या एकमेव लढतीत अखेरपर्यंत रंगत कायम होती. ब्रिस्बेनमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत यजमान संघाने थोड्या फरकाने विजय नोंदवला.
अॅडम झम्पाने यजमान संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, पण ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी करीत आॅस्ट्रेलियाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली होती. मॅक्सवेलमधील ‘एक्स-फॅक्टर’मुळे आॅस्ट्रेलियाने त्याच्यावर प्रदीर्घ कालावधीपासून विश्वास दाखविला आहे. आता संघाला काही परत करण्याची मॅक्सवेलची वेळ आहे. बुधवारी त्याची खेळी उल्लेखनीय होती. मॅक्सवेलने कामगिरीत सातत्य राखले तर आॅस्ट्रेलियन संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगळी छाप सोडण्याची संधी राहील.
कुलदीप यादवने प्रथमच प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवलेले नाही. आॅस्ट्रेलियन फलंदाजांना त्याची गोलंदाजी समजून घेण्यात अडचण येत होती. विशेषता त्याच्या ‘गुगली’चा त्यांना अंदाज येत नव्हता. कुलदीपला कसोटी संघात
स्थान दिलेले आहे, ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे. पाचवा गोलंदाज विराट कोहलीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषत: हार्दिक पांड्या सध्या उपलब्ध नसल्यामुळे आणि आघाडीच्या सहा फलंदाजांमध्ये गोलंदाज म्हणून पर्याय नसल्यामुळे एखाद्या गोलंदाजांना वाईट दिवस असेल, तर कर्णधार विराट हतबल होतो. बुधवारी कृणाल पांड्या आणि खलील अहमद दोघेही महागडे ठरले. हा केवळ पहिलाच सामना होता, पण भारतीय संघ व्यवस्थापन मेलबोर्नमधील लढतीपूर्वी नक्कीच गोलंदाजीमधील बदलाबाबत विचार करेल, हे निश्चित. भारताचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार झाले नाही. काही झेल सुटले, पण तो फार चिंता करण्याचा विषय आहे, असे मला वाटत नाही.
के. एल. राहुलने विराटपूर्वी तिसºया क्रमांकावर फलंदाजी करणे मला कधीच पचनी पडले नाही. भारताने इंग्लंडमध्येही राहुलला तिसºया क्रमांकावर खेळविले होते, पण त्यावेळी तो आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंड दौºयावर गेला होता. सध्या गेल्या दोन महिन्यांपासून तो लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे माझ्या मते विराटने तिसºया क्रमांकावर खेळायला हवे. संघातील सर्वोत्तम फलंदाजाने टी२० लढतीमध्ये शक्य तेवढे अधिक चेंडू खेळायला हवे. त्यामुळे सलामीची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर कर्णधारने मैदानात दाखल व्हायला हवे, असे मला वाटते.
धवन महत्त्वाचा खेळाडू
शिखर धवन सूर गवसण्यासाठी एक खेळी दूर होता आणि चेन्नईत विंडीजविरुद्ध ९० पेक्षा अधिक धावांची खेळी केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला. त्याने चांगले फटके लगावले.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा तो महत्त्वाचा खेळाडू आहे. दौºयाच्या सुरुवातीलाच त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होणे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे.
Web Title: Virat Kohli will play at number three
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.