विराट कोहली 'या' दिवशी खास संघाविरूद्ध ५०वे शतक ठोकेल, सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी

विराट कोहलीच्या नावावर सध्या वन डे क्रिकेटमध्ये ४८ शतके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 02:33 PM2023-10-25T14:33:04+5:302023-10-25T14:34:23+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli will slam his 50th ODI Century against South Africa at the Eden Gardens on his birthday says Sunil Gavaskar | विराट कोहली 'या' दिवशी खास संघाविरूद्ध ५०वे शतक ठोकेल, सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी

विराट कोहली 'या' दिवशी खास संघाविरूद्ध ५०वे शतक ठोकेल, सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Sunil Gavaskar: टीम इंडियाचा दमदार फलंदाज आणि 'रनमशिन' विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. भारताकडून World Cup 2023 स्पर्धेत खेळताना विराट कोहलीने ५ सामन्यात ३५४ धावा केल्या आहेत. भारताची (Team India) पहिल्या सामन्यात अडखळती सुरूवात झाली होती. त्यावेळी विराट कोहलीने राहुलच्या साथीने दमदार भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्या सामन्यात विराटने ८० पेक्षा जास्त धावा केल्या. बांगलादेशविरूद्ध विराटने दमदार शतक ठोकले. वन डे क्रिकेटमधील ते त्याचे ४८वे शतक ठरले. न्यूझीलंडविरूद्ध विराटने एकाकी झुंज देत ९५ धावा केल्या, पण त्याचे शतक हुकले. वन डे क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह अव्वल स्थानी आहे. त्याला मागे टाकण्यासाठी आणि शतकांचे अर्धशतक ठोकण्यासाठी विराटला २ शतकांची गरज आहे. याचबद्दल भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

"विराट कोहली आपल्या वन डे क्रिकेट कारकिर्दीतील ५० वे शतक ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकावेल. स्वत:च्या वाढदिवशी त्यापेक्षा मोठे गिफ्ट काय असू शकते? कोलकाताच्या सामन्याआधी त्याच्याकडे दोन सामने आहेत. त्यापैकी एका सामन्यात तो ४९वे शतक पूर्ण करू शकतो. इडन गार्डन्स हे त्याचे आवडते ठिकाण आहे. त्या ठिकाणी क्रिकेटचे चाहते खूप जास्त आहेत. इडन गार्डन्सवर शतक ठोकल्यानंतर तेथील स्टेडियममधील लोक तुमचे उभे राहून अभिनंदन करतात, त्यामुळे ही बाब कायमच पाहण्याजोगी असते. तेथील वातावरण भारावून टाकणारे असते. अशा ठिकाणी ५०वे शतक झळकावणे कधीही सर्वोत्तमच असेल," अशी मोठी भविष्यवाणी सुनील गावसकरांनी केली आहे.

दरम्यान, आतापर्यंत भारताच्या दमदार कामगिरीमागे सांघिक प्रयत्न दिसून आले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये आहेत. केएल राहुलने आपल्या फलंदाजीची चमक दाखवून दिली आहे. तसेच गोलंदाजीत सिराज आणि बुमराह जोडीने चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीने देखील मिळालेल्या एकमेव संधीचे सोन करत एकाच सामन्यात ५ बळी घेतले आहेत. त्यामुळे भारत अजूनही या स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानला जात आहे.

Web Title: Virat Kohli will slam his 50th ODI Century against South Africa at the Eden Gardens on his birthday says Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.