Join us  

Virat Kohli Babar Azam: क्रिकेट पलिकडली दोस्ती! पाकिस्तानच्या बाबरचं ट्वीट अन् आता विराटनेही दिलं मन जिंकणारा रिप्लाय

Bromance beyond Cricket: विराटने दिलेल्या रिप्लायमुळे बाबर आणि कोहलीमधील मैत्रीचं नातं हे क्रिकेट पलिकडलं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 6:17 PM

Open in App

Virat Kohli reaction on Babar Azam: लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर बुधवारी टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १४६ धावांवरच बाद झाला. या मोठ्या पराभवानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीवर टीकेची झोड उठली. पण सामन्याचा निकाल आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष एका वेगळ्याच ट्विटकडे वेधले गेले. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने ते ट्वीट केले होते. बाबर आझमने विराट कोहलीसोबत एक फोटो टाकत, 'ही (वाईट) वेळही निघून जाईल', असा पाठराखण करणारा संदेश दिला. या मैत्रीचे आणि ट्वीटचे साऱ्यांनीच कौतुक केले. त्यानंतर आता खुद्द विराटने त्यावर रिप्लाय दिला आहे. ( Bromance beyond Cricket )

विराट कोहली गेली सुमारे तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकाची वाट पाहत आहे. सध्या तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यावर आहे. एकेकाळचा रनमशिन असलेल्या विराटच्या बॅटमधून सध्या धावाच निघत नाहीत. अनेक दिग्गज आणि चाहते त्याला साथ देत आहेत. तशातच बाबर आझमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यानंतर आता विराटने त्यावर रिप्लाय दिला. धन्यवाद. चमकदार कामगिरी करत राहा आणि प्रगती करत राहा. तुलाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे अगदी मोजक्या शब्दात विराटने बाबर आझमचे आभार मानले

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष कायमच टोकाचा असतो. असे असताना बाबर आझमने असे ट्विट करण्याचे मोठं मन दाखवल्याने सर्वांनाच ते आवडलं. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. बाबर आझमचं हे ट्विट ४१ हजारांहून अधिक वेळा रिट्विट झालं आणि लाखो लोकांनी लाईकही केलं. त्यानंतर विराटने त्याला रिप्लाय दिल्याने या दोघांची दोस्ती क्रिकेट पलिकडली दोस्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीबाबर आजमभारतीय क्रिकेट संघट्विटर
Open in App