नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीला एकही शतक ठोकू देणार नसल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने केले आहे. या वर्षाखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी माईंड गेम करायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने, तीन वन-डे व तीन टी20 सामने खेळणार आहे. सध्या ऑस्ट्रेल्याच्या संघाची स्थिती खराब आहे. इंग्लंड संघाने वनडे मध्ये व्हाईट वॉश दिला आहे. त्यामुळे आशा प्रकारच्या वक्तव्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Cricket 7 शी बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, भारतीय उपखंडात विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये असला तरीही त्याला ऑस्ट्रेलियात एकही शतक झळकावू शकणार नाही, याचसोबत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात दारुण पराभवाला सामोर जावे लागेल. भारतीय संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीला लवकरात लवकर बाद करण गरजेचं असल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथनेही म्हटलं होतं.
2014-15 च्या दौऱ्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाची वेगवाग गोलंदाजी फोडून काढली होती. या दौऱ्यात कोहलीने कसोटीमध्ये चार शतके झळकावली होती. या दौऱ्यानंतर कसोटी फलंदाज म्हणून विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. 2014-15 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीने चार द्विशतके झळकावली आहेत. त्यामुळे कमिन्सने केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आगामी दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज आणि विराट कोहली यांच्यातलं द्वंद्व कसं रंगतं याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.