Join us

विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम

Indian Cricketer Retirement: 'हा' खेळाडू IPL मध्ये दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि बंगलोर या ४ संघातून खेळला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 21:33 IST

Open in App

Indian Cricketer Retirement : विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांच्यासह २००८ च्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल (Siddharth Kaul Retirement) गुरुवारी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, त्याने परदेशी लीगमध्ये खेळण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. कौलने २०१८-१९ दरम्यान भारतासाठी तीन वनडे आणि काही टी२० सामने खेळले होते. इतकंच नव्हे तर तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघातही होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा

मूळचा पंजाबचा असलेला ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. कौलने लिहिले की, आता भारतातील कारकीर्द संपवण्याची आणि निवृत्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे. देवाने माझ्यासाठी जो मार्ग निर्माण केला आहे, त्यात मला अविरत पाठिंबा दिल्याबद्दल, माझ्या आई-वडिलांचे आणि कुटुंबीयांनी मला दिलेल्या पाठिंब्याचे, त्यांनी केलेल्या त्यागाते आणि आत्मविश्वासाबद्दल आभार. ड्रेसिंग रूममधील आठवणी आणि मैत्रीसाठी माझ्या संघसहकाऱ्यांना, भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि 2008 वर्षाखालील 19 विश्वचषक जिंकण्याचे आणि 2018 मध्ये माझे T20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल BCCI चे आभार!

सिद्धार्थची कारकीर्द

सिद्धार्थ कौलने पंजाबसाठी ८८ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि २९७ विकेट घेतल्या. या वेगवान गोलंदाजाने १११ लिस्ट ए मॅचमध्ये १९९ विकेट्स आणि १४५ टी20 मॅचमध्ये १८२ विकेट घेतल्या आहेत. कौल विजय हजारे ट्रॉफीमध्ये १५५ विकेट्स आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १२० विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या महिन्याच्या सुरुवातीला हरियाणाविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये त्याने शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद