Join us  

समान धावा, एक डक! विराट कोहली-शुबमन गिल यांच्या आकडेवारीतील साम्य पाहून लागेल वेड!

IPL 2023 : शुबमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे टीम इंडियाचा भविष्याचा सुपरस्टार म्हणून पाहिले जात आहे आणि तोही त्याच्या सातत्यपूर्ण खेळीतून हा विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 4:03 PM

Open in App

IPL 2023 : शुबमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे टीम इंडियाचा भविष्याचा सुपरस्टार म्हणून पाहिले जात आहे आणि तोही त्याच्या सातत्यपूर्ण खेळीतून हा विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय... एकीकडे विराट कोहली ( Virat Kohli) त्याच्या कारकीर्दिच्या अखेरच्या टप्प्यात असताना शुबमन हा उदयोन्मुख फलंदाज चाहत्यांना मंत्रमुग्ध करतोय... इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट व शुबमन हे अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सकडून खेळतात.. या दोन्ही खेळाडूंच्या आकडेवारीतील साम्य सध्या सगळ्यांना चक्रावून टाकणारे आहे. आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर, तर शुबमन तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

विराट व शुबमन यांनी ८ सामन्यांत प्रत्येकी समान ३३३ धावा केल्या आहेत आणि इतकेच नव्हे, तर या दोघांच्या यंदाच्या लीगमधील आकडेवारीत बरेच साम्य दिसत आहेत. ३३३ धावा करण्यासाठी विराट व शुबमन या दोघांनी समान २३४ चेंडूंचा सामना केला आहे. हे दोघं आपापल्या संघासाठी ओपनिंगला येतात. त्यांच्या स्ट्राईक रेटही १४२.३० असा समान आहे आणि दोघंही एकदा शून्यावर बाद झाले आहेत.   ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट व शुबमन यांच्यात टक्कर दिसतेय, परंतु RCBचा फॅफ ड्यू प्लेसिस ४२२ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने आणि विराटने प्रत्येकी ५ अर्धशतकं झळकावली आहेत. गिलच्या नावावर ३ अर्धशतकं आहेत. गुणतालिकेबाबत बोलायचे झाल्यास RCB ८ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवून पाचव्या, GT ६ विजयासह अव्वल स्थानावर आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीशुभमन गिल
Open in App