Join us  

कोहलीचं विराट द्विशतक, भारताची विजयाच्या दिशेनं आगेकूच, श्रीलंका बॅकफूटवर

मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी झळकावलेली दमदाक शतकं आणि कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक या जोरावर भारताने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत बसवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 4:57 PM

Open in App

नागपूर - मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी झळकावलेली दमदाक शतकं आणि कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक या जोरावर भारताने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत बसवली आहे. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आपला पहिला डाव सहा बाद 610 या धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात भारतीय संघाकडे 405 धावांची आघाडी होती.  दुसऱ्या डावात श्रीलंकेची सुरुवात खराब सुरुवात झाली. इशांत शर्मानं दुसऱ्या चेंडूवर श्रीलंकेला पहिला धक्का दिला. सलामिवीर सदीरा समरविक्रमा शुन्य धावांवर त्रिफाळाबाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने एक गडी झटपट गमावत 21 धावा केल्या आहेत, करुणारत्ने 11 धावांवर आणि थिरिमने 9 धावांवर नाबाद आहे. नागपूर कसोटीचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत. श्रीलंकेचा संघ अजूनही 384 धावांनी पिछाडीवर आहे, त्यामुळे चौथ्या दिवशी भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.

त्यापूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज द्विशतक झळकावत श्रीलंकेला बॅकफूटलला ढकललं. श्रीलंकेकडून दिमुथ करुणरत्नेने ३ बळी घेतले. त्याला गमगे, हेरथ आणि शनकाने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र तोपर्यंत भारतीय फलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकानंतर रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावले. त्यानंतर विराट कोहलीने डाव घोषित करुन उरलेल्या वेळात श्रीलंकेच्या संघाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मात्र इशांत शर्माने पहिल्याच षटकात समरविक्रमाचा त्रिफळा उडवत लंकेला पहिला धक्का दिला. 

पुजाराने 143 धावा कुटल्या आहेत. पुजाराला विराट कोहलीनेही चांगली साथ दिली. तिसऱ्या दिवशीसुद्धा श्रीलंकेच्या गोलंदाजांना अपयश आलं आहे. पुजाराचा घेतलेल्या बळीव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजांवर दबाव टाकणं लंकेच्या गोलंदाजांना जमलं नाही. त्यामुळे उर्वरित दोन सत्रांत भारताच्या फलंदाजांना बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाजांना असं अपयश येत राहिल्यात भारताचा विजय सोपा होईल. तर दुस-या दिवशी सलामीवीर मुरली विजयसह (१२८ धावा, २२१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार), चेतेश्वर पुजाराने (नाबाद १२१ धावा, २८४ चेंडू, १३ चौकार) वैयक्तिक शतके झळकावताना दुस-या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने २ बाद ३१२ धावांची मजल मारली होती. श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुस-या कसोटी सामन्यावर भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. विजय बाद झाल्यानंतर पुजाराने अर्धशतकी खेळी करणा-या कर्णधार कोहलीसह (नाबाद ५४ धावा, ७० चेंडू, ६ चौकार) तिस-या विकेटसाठी ९६ धावांची अभेद्य भागीदारी केली आणि भारताला विशाल धावसंख्येचा पाया रचून दिला.

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयश्रीलंका