- हर्षा भोगले
अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ संकटात सापडला होता. गोलंंदाजांनी संघाला तारले. दुसरीकडे वेस्ट इंडिजने न्यूझीलंडच्या नाकीनऊ आणले होते. केवळ थोड्या फरकाने विजय दूर राहिला. भारत या स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ आहे. नऊ गुणांसह उपांत्य फेरीच्या दारात उभा आहे. दुसरीकडे चाहत्यांच्या सर्वाधिक पसंतीचा विंडीज संघ मात्र तीन गुणांवर असल्याने उपांत्य फेरीबाहेर झाला.
अफगाणिस्तानविरुद्धची लढत भारतासाठी ‘धोक्याची घंटा’ होती. सध्याच्या विश्वचषकात भारताला आपल्या चुका शोधण्याची संधी मिळाली नव्हती. द. आफ्रिका आणि पाकिस्तानला सहज पराभूत केल्याने असे घडले असावे, पण अफगाणिस्तानविरुद्ध डोळे उघडले. थोडीशी चूक किती महागडी ठरते याची महती कळली. यामुळे भारतीय संघाला राखीव बाकावरील ताकद ओळखता आली. शमीने शानदार गोलंदाजी केली पण आघाडीच्या पाच गोलंदाजांपैकी कुणीही सातव्या स्थानावर विश्वासाने फलंदाजी करू शकत नाही. अशावेळी कुण्या एकाला संघाबाहेर बसावे लागेल. शमी आणि भुवनेश्वर खेळत असतील तर संघ व्यवस्थापनाला निर्णय घेणे कठीण होईल.
गोलंदाजीत भारत इतका बलाढ्य दिसतो हे दीर्घकाळानंतर पहायला मिळाले. याआधी गोलंदाजीची अधिक चिंता असायची. त्यासाठी कुठल्या फलंदाजाला बाहेर ठेवायचे यावर चर्चा होत असे. सध्या गोलंदाजीत स्पर्धा असल्याने कुणाला बाहेर ठेवावे, याचा विचार होतो. गोलंदाजांनी ते मॅचविनर आहेत, असे मानायला हरकत नाही.
विराटने मोठी खेळी करावी अशी टीम इंडियाची इच्छा असेल. अफगाणिस्तानविरुद्ध विराट फॉर्ममध्ये दिसला. दुसरीकडे लोकेश राहुल विंडीजकडून असलेला सर्वांत मोठा धोका म्हणजे नव्या चेंडूने होणारा धारदार मारा खेळण्यात यशस्वी ठरल्यास संघाचा पुढचा मार्ग सोपा होणार आहे.
विंडीज संघ धोकादायक आहे. पण ५० षटकांच्या सामन्यात असे घडू शकते का, याबद्दल ठामपणे सांगता येणार नाही. या संघापासून सावध असायला हवे. पण यामुळे आपली झोप उडेल इतकीही काळजी करण्याची गरज नाही.
Web Title: Virat Kohli's expectations from Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.