Join us

अनुष्काच्या 'सुई-धागा' चित्रपटावर फिदा झाला विराट कोहली; पाहा काय म्हणाला

विराट कोहली विश्रांतीचा काळ एंजॉय करत आहे, तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा तिच्या नव्या चित्रपटच्या प्रमोशनात व्यग्र आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 14:02 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विराट हा विश्रांतीचा काळ एंजॉय करत आहे, तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा तिच्या नव्या चित्रपटच्या प्रमोशनात व्यग्र आहे. अनुष्का आणि वरून धवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'सुई-धागा' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. विराटनेही हा चित्रपट पाहिला आणि तो चक्क क्लीन बोल्ड झाला. त्याने अनुष्का आणि वरूण धवन यांच्या अभिनयावर कौतुकांचा वर्षाव केला. हा चित्रपट मी दोन वेळा पाहिला आणि पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा पाहताना तो अधिक आवडला असे कोहलीने ट्विट केले. तो म्हणाला," सुई-धागा हा चित्रपट मी काल दोनवेळा पाहिला. मला तो खूप आवडला. अत्यंत भावनिक चित्रपट असून सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे." या चित्रपटात वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे आणि मौजी हे कॅरेक्टर प्ले करत आहे. अनुष्का त्याच्या पत्नीच्या ( ममता)  भूमिकेत आहे. विराटने वरुणचे विशेष कौतुक केले आणि अनुष्कानेही चाहत्यांची मनं जिंकल्याचे सांगितले. तो म्हणाला," मौजीची व्यक्तिरेखा वरूणने अप्रतिम साकारली आहे, परंतु ममता या पात्राने माझं मनं जिंकलं. तिची व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आहे आणि अनुष्काने ती रेखाटण्यासाठी प्राण ओतले आहे. तिचा मला अभिमान आहे."

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासुई-धागा