Join us  

विराट कोहलीचा फिटनेस पाहून सारे थक्क, टीम इंडियाने लुटला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर आठच्या महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 5:01 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर आठच्या महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी भारतीय संघ बार्बाडोस येथे दाखल झाला आहे. भारताचा पहिला सामना २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. शेवटच्या साखळी सामन्यात कॅनडाविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ कॅरेबियन बेटांवर आला. आता बार्बाडोसच्या चमकदार निळ्या समुद्रात आणि सुंदर चौपाटीवर खेळाडूंनी स्वतःला रिचार्ज करण्यासाठी योग्य विश्रांती घेतली.

भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

BCCI ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू बीच व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. ग्रुप १ मध्ये आता भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर होईल, तर ग्रुप २ मध्ये अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. सुपर ८ मध्ये प्रत्येक संघ ३ सामने खेळतील आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.  

 

सुपर ८ चे वेळापत्रक १९ जून: अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा१९ जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया२० जून: अफगाणिस्तान विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, बार्बाडोस२० जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा२१ जून: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आइलेट, सेंट लुसिया२१ जून: अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाउन, बार्बाडोस२२ जून: भारत विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा२२ जून: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट२३ जून: अमेरिका विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, बार्बाडोस२३ जून: वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा२४ जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया२४ जून: अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहलीऑफ द फिल्ड