नवी दिल्ली, दि. 4 - वा-याच्या वेगाने धावणारा, वेगाचा बादशाह अशी ख्याती असणारा जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट निवृत्ती घेत आहे. पृथ्वीतलावरचा सर्वात वेगवान धावपटू आणि १०० मीटर व २०० मीटर विश्वविक्रमाचा मानकरी असलेला उसैन बोल्ट, लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिअन्सशिपमध्ये आज (शुक्रवारी) आपल्या अविस्मरणीय कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावणार आहे. या शर्यतीसाठी त्याच्यावर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. या शुभेच्छुकामध्ये आता भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव सामील झाले आहे. विराटने ट्विटरद्वारे उसैन बोल्टला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या शर्यतीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत उसैन बोल्टला शुभेच्छा तर दिल्याच त्याशिवाय त्याला क्रिकेट खेळण्याचे आमंत्रण दिले आहे. या पोस्टमध्ये विराट म्हणतो, शुक्रवारी तुझी शेवटची रेस असेल, पण धावपट्टी बाहेर आणि धावपट्टीवर तूच बादशाह राहणार आहे. त्यासाठी माझ्या तुला शुभेच्छा! जर तू क्रिकेट खेळण्याचा विचार करत असेल तर तूझं स्वागत:च आहे.कदाचित तुम्हाला माहित नसेल पण बोल्टला क्रिकेट खूप आवडते. गोलंदाजीत वकार युनुस त्याचा आवडता खेळाडू. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम.सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघं आवडते फलंदाज आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट कोहलीनं वेगाच्या बादशाहला दिलं आमंत्रण
विराट कोहलीनं वेगाच्या बादशाहला दिलं आमंत्रण
वा-याच्या वेगाने धावणारा, वेगाचा बादशाह अशी ख्याती असणारा जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट निवृत्ती घेत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 8:59 PM