Join us

विराट कोहलीची आवडती 'Audi' कार मुंबई पोलिसांकडे धूळ खात पडलीय!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागड्या गाड्यांची आवड असल्याचे सर्वांना माहित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:19 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागड्या गाड्यांची आवड असल्याचे सर्वांना माहित आहे. त्याच्या याच महागड्या गाड्यांमध्ये एकेकाळी डौलात उभी असलेली '2012 Audi R8 V10' ही गाडी आजच्या घडीला मुंबई पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात पडली आहे. कोहलीला फॉलो करणाऱ्या प्रत्येकाला गाडीची ही अवस्था पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. विशेष म्हणजे कोहली हा ऑडी कंपनीचा भारतातील सदिच्छादूत आहे. 

कोहलीच्या गॅरेजमध्ये सध्याच्या घडीला Audi Q7, RS5, RS6, A8 L and R8 V10 LMX या गाड्यांचा ताफा आहे. यासह कोहलीकडे बेंटली, रेंज रोव्हर आणि पापारॅझ्झी या ब्रँडेड गाड्याही आहेत. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर अनेकदा कोहलीनं या गाड्यांवर हात साफ केले आहे. त्याने त्याची ड्रायव्हिंग स्कील दाखवली आहे. R8 ही स्पोर्ट्स कार केवळ भारतातील सेलेब्रिटींच्या पसंतीतील कार नाही, तर जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. 

मग कोहलीची Audi R8 V10 ही कार मुंबई पोलिसांकडे कशी? Audi R8 V10 ही गाडी मुंबई पोलिसांकडे जप्त राहण्यासारखे कोहलीनं काही केलेलं नाही. त्याने दोन वर्षांपूर्वी सागर ठक्कर या व्यक्तीला ही कार विकली, परंतु ही व्यक्ती आर्थिक घोटाळ्यात अडकली आणि पोलिसांनी त्याच्याकडून ती कार जप्त केली.   

टॅग्स :विराट कोहलीआॅडी