Join us  

...म्हणून कोहलीची 'ती' ऑडी कार पोलीस ठाण्यात धूळ खातेय

विराट कोहलीने विकलेली कार पोलीस कारवाईत जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 6:41 AM

Open in App

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची एक कार सध्या मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये खटारा झालेली आहे. कोहलीने ही कार विकली होती. पण, विकत घेणाऱ्याविरुद्ध घोटाळ्याचा आरोप असल्यामुळे पोलीस कारवाईमध्ये ही कार जप्त करण्यात आली. पोलीस ठाण्यामध्ये भारतीय सुपरस्टारची कार आता हलाखीच्या स्थितीत आहे. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या आलिशान कारचे दार तुटलेले आहे.टायर खराब झालेले असून धुळीमुळे कारचा पांढरा रंग आता मळकट झाला आहे. कारचे सामान खराब झाले असून आतमध्येही तुटलेले आहे.कोहलीची ही दुर्दैवी कार ऑडी आर-८, २०१२ चे मॉडेल आहे. कोहलीने नवी कार विकत घेतल्यानंतर ऑडी आर-८ वर्ष २०१६ एका एजंटच्या माध्यमातून विकली होती. एजंटकडून ज्याने ही कार विकत घेतली होती त्याचे नाव समीर ठक्कर होते. दोन महिन्यांनंतर त्याच्यावर कॉल सेंटर घोटाळ्याचा आरोप निश्चित झाला.सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ठक्करने कोहलीची ही कार आपल्या मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी अडीच कोटी रुपयांत विकत घेतली होती. गुन्ह्यामध्ये नाव पुढे आल्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी ठक्कर भूमिगत झाला. दरम्यान, घोटाळ्याच्या संदर्भात केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांनी ठक्करची संपत्ती जप्त केली. त्यात विराट कोहलीच्या कारचाही समावेश आहे. जप्त करण्यात आल्यानंतर कारला पोलीस ठाण्यामध्ये अन्य वाहनांप्रमाणे ठेवण्यात आले. आता विराट कोहलीचा या कारसोबत किंवा या प्रकरणासोबत कुठलाही संबंध नाही. त्याने आपली कार विकताना कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली होती. 

टॅग्स :विराट कोहली