भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी आगामी बांगलादेश संघाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. पुढील वर्षी होणारी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून कर्णधार विराट कोहलीवरील कामाचा भार कमी करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यामुळेच बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघ दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. तोपर्यंत कोहलीला विश्रांती आहे. मग, विश्रांती मिळताच कोहली फिरायला गेला आहे आणि त्यानं पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तासाभरात या फोटोला 20 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले.
Breaking : सौरव गांगुलीनं टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं रोहित शर्माकडे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी 3-0 अशी जिंकली. या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशचा सामना करणार आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी टीम इंडियाची निवड केली गेली. या बैठकीला बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली, निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. ट्वेंटी-20 साठी जाहीर केलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निवड समिती अध्यक्षांनी केले मोठे विधान
रवी शास्त्रींचा पत्ता कट ! धोनीच्या भवितव्याबाबत गांगुलीने केली विराट आणि कोहलीशी चर्चा
भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं विचार करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंवर पडणारा ताणही लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. 3 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. त्यानंतर 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार आहे. तोपर्यंत कोहली सुट्टीवर आहे.