Virat Kohli's press conference Live : मला कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे नाही, विराट कोहलीनं खराब फॉर्मावर मांडलं स्पष्ट मत 

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : अखेर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:23 PM2022-01-10T15:23:26+5:302022-01-10T15:23:44+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli's press conference Live : "I truly believe that I don't need to prove anything to anyone.", | Virat Kohli's press conference Live : मला कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे नाही, विराट कोहलीनं खराब फॉर्मावर मांडलं स्पष्ट मत 

Virat Kohli's press conference Live : मला कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे नाही, विराट कोहलीनं खराब फॉर्मावर मांडलं स्पष्ट मत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : अखेर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत आला.. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटनं फोडलेल्या फटाक्यांनी बीसीसीआय व निवड समितीची डोकेदुखी वाढवली होती. पण, आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाल्यानंतर विराटनं प्रथमच पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी विराट डिफेन्सिव्ह ( बचावात्मक) मोडमध्ये दिसला अन् त्यानं उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीबाबत, त्याच्या तंदुरुस्तीबाबत अन् संघाबाबतच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यानं तिसरी कसोटी खेळण्यासाठी मी पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचे सांगितले.

''आम्ही सातत्यानं क्रिकेट खेळतोय. या सर्व सामन्यांसाठी तंदुरूस्त राहिलो याचा मला अभिमान वाटतो, परंतु तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी गृहीत धरता. मी सर्व फॉरमॅटमध्ये खेळतोय + २०१२ पासून आयपीएल खेळतोय. त्यामुळे दुखापत होणे हे स्वाभाविक आहे. खेळाडूंच्या वर्क लोडवर काम होणं गरजेचं आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूला मुकावे लागणे, अशी परिस्थिती तुम्हाला नको असते,'' असे विराटनं सांगितले.

''माझ्या संघासाठी मी योगदान देऊ शकतो, याचा मला सार्थ अभिमान आहे, त्यामुळेच दीर्घ काळ मी चांगली कामगिरी करू शकलो. मागील काही वर्षांत मी संघाच्या महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार होतो. जेव्हा मी कर्णधारपद हाती घेतलं. तेव्हा आम्ही जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर होतो. आता मागील ४-५ वर्षांत आम्ही नंबर वन वर आहोत. हे सांघिक यश आहे. मला असे वाटते की मला कुणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही,''असे विराट म्हणाला .

Web Title: Virat Kohli's press conference Live : "I truly believe that I don't need to prove anything to anyone.",

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.