नवी दिल्ली : प्रत्येक खेळाडूसाठी देश महत्वाचा असतो. जेव्हा खेळण्यापूर्वी किंवा पदक जिंकल्यावर देशाच्या राष्ट्रगीताची धुन वाजते तेव्हा खेळाडूंचे डोळे पाणावतात, त्यांचा उर भरून येतो. पण भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र देशापेक्षा कौंटी क्रिकेटला अधिक महत्व देत असल्याची बाब पुढे येत आहे.
अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताबरोबर 14 जूनला होणार आहे. या दरम्यान कोहलीने कौंटी क्रिकेट खेळायला इंग्लंडमध्ये जाणार आहे. कारण त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात चांगली फलंदाजी करता यावी, यासाठी कोहलीला कौंटी क्रिकेट खेळायचे आहे. दुसरीकडे बीसीसीआयने मात्र कोहलीने कसोटी सामना खेळावा, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे देशासाठी कसोटी सामना खेळायचा कि स्वत:च्या धावांसाठी कौंटी क्रिकेटला प्राधान्य द्यायचे, हा यक्षप्रश्न कोहलीपुढे असेल.
याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, " जर आम्ही कोहलीला कसोटी क्रिकेट खेळण्याऐवजी कौंटीमध्ये खेळण्याची मुभा दिली तर एक वाईट प्रथेला सुरुवात होईल. त्याचबरोबर क्रिकेट जगतासहीत अफगाणिस्तानच्या संघालाही चांगला संदेश जाणार नाही. त्यामुळे कोहलीने कौंटी क्रिकेटपेक्षा कसोटी सामन्याला प्रधान्य द्यायला हवे. "