Join us  

विराट-रोहितच्या भांडणाची चर्चा तर होणारच; सांगत आहेत सुनील गावस्कर

या भांडणाची चर्चा तर होणारच, असे वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समाचोलक सुनील गावस्कर यांनी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 7:04 PM

Open in App

मुंबई : भारताला विश्वचषकात उपांत्य फेरीत पराबव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय संघात गट-तट असल्याचे वृत्त समोर आले होते. त्याबरोबर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये भांडण असल्याचे वृत्तही पुढे आले होते. पण या भांडणाची चर्चा तर होणारच, असे वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समाचोलक सुनील गावस्कर यांनी केले आहे.

गावस्कर यांनी आपल्या स्तंभामध्ये गावस्कर यांनी कोहली-रोहित यांच्या भांडणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या स्तंभात गावस्कर यांनी लिहीले आहे की, " विराट आणि रोहित हे जर इमारतीवर चढूनही जोरात ओरडून म्हणाले की, आमच्यामध्ये भांडण नाही, तरीही त्यावर चाहते विश्वास ठेवणार नाही. जर एखाद वेळी रोहित जर लवकर आऊट झाला तर तो जाणूनबुजून झटपट बाद झाला, असे म्हणतील."

या स्तंभात गावस्कर यांनी पुढे लिहीले आहे की, " विराट आणि रोहित यांच्यामध्ये भांडण आहे, ही बातमी जे पसरवत आहे ते भारतीय संघाचे हितचिंतक नाहीत. काही वेळात संघातील त्रस्त झालेला खेळाडू अशा गोष्टी पसरवत असतो. या खेळाडूच्या वागण्यामुळे संघाचे नुकसान होत असते. काही वेळा प्रशासकीय अधिकारीही यामध्ये राजकारण करताना पाहायला मिळतात."

गावस्कर यांनी पुढे लिहीले आहे की, " मीडीयासाठी तर अशा बातम्या सुखावह असतात. कारण जेव्हा क्रिकेट चांगले सुरु असते तेव्हा अशा गोष्टी दिसत नाहीत. पण जेव्हा क्रिकेट चांगले सुरु नसते तेव्हा मात्र अशा गोष्टी पाहायला मिळतात. विराट आणि रोहित हे दोघेही व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. हे दोघेही मैदानात उतरतील आणि देशाला विजय मिळवून देतील. पण या दोघांमध्ये भांडण असल्याची गोष्ट मात्र 20 वर्षांपर्यंतही चिघळत राहील."

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्मासुनील गावसकर