मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारताने वर्चस्व गाजवताना सातव्यांदा जेतेपद उंचावले. अंतिम लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर तीन गड्यांनी विजय मिळवला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेत केदार जाधवने भारताला जेतेपद जिंकून दिले. मात्र, बांगलादेशच्या चाहत्यांना हा पराभव पचनी पडलेला नाही. बांगलादेशच्या एका चाहत्याने चक्क विराट कोहलीचे संकेतस्थळ हॅक करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी)ला टार्गेट केले.
अंतिम सामन्यात लिटन दासने ११७ चेंडूंत १२१ धावा केल्या. त्याला महेंद्रसिंग धोनीने यष्टिचित केले. तिसऱ्या पंचाने त्याला बाद ठरवले. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा निर्णय पटला नाही. तो निर्णय हेतुपुरस्पर भारताच्या बाजूने दिल्याचा दावा चाहत्यांनी केला. यामुळे बांगला चाहत्याने चक्क कोहलीचे संकेतस्थळ हॅक करुन आयसीसीला त्या निर्णयाचा जाब विचारला.
Web Title: Virat Kohli's website hacked, threatens ICC to ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.