Join us  

'विराट' नुकसान; कोहलीच्या या एका निर्णयामुळे RCBला ११ कोटींचा फटका

भारतीय संघाचा कर्णधार विरट कोहलीमुळं आरसीबीला 11 कोटींचा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 2:24 PM

Open in App

बंगळुरु - भारतीय संघाचा कर्णधार विरट कोहलीमुळं आरसीबीला 11 कोटींचा फटका बसला आहे. दिपिका पादुकोनसोबत एका जाहिरातीमध्ये काम करण्यास विराट कोहलीनं नकार दिल्यामुळं हा फटका बसला आहे. आज प्रत्येक स्टार दिपिकासोबत काम करण्यासाठी तयार असतो. पण विराट कोहलीनं जाहिर करण्यास नकार दिला आहे. विराटच्या नकाराचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र विराटच्या या निर्णयामुळं आरसीबीला 11 कोटींचा फटका बसला आहे. 

गेल्या आठवड्यात इन्साग्रामने विराट कोहली आणि दिपिका पादुकोनला सर्वाधिक प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून जाहिर केलं होतं. अशामध्ये दोहेही एका जाहिरातीत आले तर फायदाच होऊ शकतो. या दोन्ही स्टारकडे आयपीएल 11 च्या सत्रादरम्यान एकत्र काम करण्याची संधी आली होती. पण दिपिकासोबत जाहिरात करण्यास विराट कोहलीनं स्पशेल नकार दिला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार विराटच्या या निर्णयामुळं आरसीबीला 11 कोटींचा फटका बसणार आहे. 

आरसीबीसाठी एक ट्रॅव्हल कंपनी या दोन स्टारला घेऊन एक जाहिरात करणार होती. त्यासाठी ते आरसीबीला 11 कोटी रुपये देणार होते. पण विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिल्यामुळं आरसीबीला 11 कोटींचा फटका बसणार आहे. कारण विराटच्या नकारानंतर या कंपनी जाहिरात करण्याला नकार दिला आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहली