Join us  

India vs South Africa 1st tes: 'पुजारा, कोहली अन् रहाणे म्हणजे संघावर ओझंच'; भारताची मधली फळी परत अपयशी, नेटकऱ्यांचा संताप

मधली फळी फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात संघात बदल दिसणार का? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 5:39 PM

Open in App

India vs South Africa 1st test: भारतीय संघाने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नाही. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाले. पण पहिल्या डावात या दोघांनी चांगली खेळी केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे भारताची मधली फळी म्हणजेच चेतेश्वर पुजाराविराट कोहली आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे मधल्या फळीच्या अपयशावर नेटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

भारतीय संघाकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने ०, विराट कोहलीने ३५ तर अजिंक्य रहाणेने ४८ धावा केल्या. दुसऱ्या डावात वरची फळी झटपट बाद झाल्यावर ही फळी चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा होती. पण चेतेश्वर पुजारा १६, विराट कोहली १८ आणि अजिंक्य रहाणे २० धावा करून माघारी परतले. गेल्या अनेक कसोटी सामन्यामध्ये संघाची मधली फळी सातत्याने अपयशी ठरत असल्याने हे तिघे म्हणजे भारतीय संघावर ओझंच आहेत असा संताप काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला. अनेक फॅन्सनी त्यांच्या खेळावर आणि फटका मारण्याच्या निवडीवरही टीका केली.

--

--

--

--

--

गेल्या काही सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे दोघांचीही कामगिरी सुमार आहे. विराट कोहलीदेखील बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावू शकलेला नाही. आफ्रिका दौऱ्याच्या सुरूवातीआधी रहाणे आणि पुजारा यांना संघात संधी देणं बंद करा अशा आशयाचे ट्वीट्सदेखील अनेक चाहत्यांनी केली होती. पण, आफ्रिकेतील खेळपट्ट्या पाहता संघ व्यवस्थापनाने नव्या खेळाडूंऐवजी अनुभवी फलंदाजांवरच विश्वास दाखवला. आता मात्र, पहिल्या कसोटीत मधली फळी फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात या बदल दिसणार का? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे
Open in App