नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका खिशात टाकला येईल. पण वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर भारताचा हा सलग आठवा मालिका विजय ठरणार आहे. कारण गेल्या सलग आठ एकदिवसीय मालिकांमध्ये भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. गेल्यावेळी 2006 साली भारताने वेस्ट इंडिजवर घरच्या मैदानात मालिका विजय मिळवला होता.
वेस्ट इंडिजच्या संघाचे असे झाले दिमाखात स्वागत